Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडा; निळवंडे पाटपाणी कृती समितीची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी
पाण्याचे राजकारण

निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडा; निळवंडे पाटपाणी कृती समितीची कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

निवेदन कार्यकारी अभियंता कवडे व हापसे यांनी स्वीकारले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/04/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली आहेत, मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिण्याचे पाणी आणि पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी तातडीने उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी घुलेवाडी येथील कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन दिले. हे निवेदन कार्यकारी अभियंता कवडे व हापसे यांनी स्वीकारले असून, यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, प्रभाकर गायकवाड, विजय मगर, विलास गुळवे, मच्छिंद्र काळे, दत्ता भालेराव, अनिल गुंजाळ आणि संतोष राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्या सर्वत्र उन्हाची लाट पसरल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता भासत असून शेतकऱ्यांनी उभी केलेली पिकेही जळून चालली आहेत. लोकनेते थोरात यांनी कष्टातून उभा केलेला हा प्रकल्प असतानाही सध्याचे प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन दिसत असल्याची टीका अध्यक्ष नानासाहेब शेळके यांनी केली. एप्रिल अखेरपर्यंत पाण्याचे आवर्तन मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सचिव उत्तमराव घोरपडे यांनी इशारा दिला की, शेतकरी जगाचा पोशिंदा असूनही त्यालाच पाण्यासाठी वंचित ठेवले जात आहे, जर वेळेत पाणी मिळाले नाही तर पशुधनासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यकारी अभियंता हापसे व कवडे यांनी महिनाअखेरीस पाणी सोडण्यासाठी योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

या निर्णयामुळे तळेगावसह दुष्काळी भागातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण असून कृती समितीच्या या भूमिकेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 381
आवर्तन निळवंडे पाटपाणी कृती समिती निळवंडे पाणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन जाहीर; उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्याद्वारे २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

15/04/2026

निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात १४०० क्युसेक वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू

10/04/2026

भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे आवर्तन तातडीने सुरू करण्याचे जलसंपदामंत्र्यांचे निर्देश

09/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून…

नेपाळमधील महाप्रलयात संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप; उंच ठिकाणावर असल्याने टळला मोठा अनर्थ, आज लुंबिनीतून निघून उद्या भारतात परतणार!

28/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026

गुन्हे शाखेची धडक कारवाई ५ ठिकाणी छापे, ८९ हजार रुपयांचा गुटखा व मावा जप्त

28/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.