Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हा नाट्यछटा स्पर्धा संगमनेरच्या स्पर्धकांनी गाजविली
क्रिडा व कला

जिल्हा नाट्यछटा स्पर्धा संगमनेरच्या स्पर्धकांनी गाजविली

यशस्वी स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य जागर उपक्रमांतर्गत झालेल्या जिल्हा नाट्यछटा स्पर्धेत संगमनेरच्या स्पर्धकांनी बाजी मारली. स्पर्धा गाजविणाऱ्या चारही स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली.

अहमदनगर केंद्राच्या स्पर्धा संगमनेरमधील दिगंबर गणेश सराफ महाविद्यालयात पार पडल्या. या स्पर्धेत श्रुती प्रमोद मैड हिने प्रथम, नमिता मंगेश सांगळे हिने द्वितीय, राजसी प्रसाद भणगे हिने तृतीय तर प्रज्ञा सनातन तायडे हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली. याशिवाय सर्वज्ञा अविनाश कराळे, मनस्वी प्रकाश लगड, पुष्कर पंडित दशरथ, ईशीता ऊगले व दीशिता नेहुलकर यांनी देखील गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविली.

राज्यातील २६ केंद्रांवर वेगवेगळ्या सहा नाट्यप्रकारांच्या स्पर्धा होत आहेत. सुमारे दहा हजारावर स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. नाट्यछटा स्पर्धेत नगर केंद्रातून अहमदनगर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी येथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये संगमनेरच्या स्पर्धकांनी सादर केलेल्या सादरीकरणाने जिल्ह्याच्या स्पर्धेत वर्चस्व गाजविले.

नाट्यछटा स्पर्धेचे उद्घाटन सराफ महाविद्यालयाचे प्राचार्य वाकचौरे, संगीता वाकचौरे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष तथा नियामक मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉ. संजयकुमार दळवी, उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे, स्पर्धा समन्वयक जालिंदर शिंदे, विशाल कदम यांच्या उपस्थितीत पार पडले.

सूत्रसंचालन श्रीमती दिघे आणि सुभाष कानडे यांनी केले. यशस्वी स्पर्धकांचे परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, केंद्रप्रमुख क्षितिज झावरे, केंद्रप्रमुख प्राध्यापक दळवी, अमोल खोले यांच्यासह नियामक मंडळाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.

उपक्रम यशस्वीतेसाठी संगमनेर शाखेचे धनंजय ढोले, विजयकुमार थिटे, दत्ता बटवाल, मोहसिन शेख, दत्ता गुजराथी, गणेश राजदेव यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेसाठी पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,314
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

संगमनेरात बालकला महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; बालगोपाळांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

07/09/2026

संगमनेरात जयहिंद लोकचळवळीच्या वतीने उद्या आणि परवा बालकला महोत्सवाचे आयोजन; विविध उपक्रमांसह रंगभरण स्पर्धेची पर्वणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.