Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निळवंडेच्या कामात ज्यांनी सातत्याने अडचणी आणल्या तेच आज श्रेय घेण्यासाठी पुढे -आमदार बाळासाहेब थोरात
विकास

निळवंडेच्या कामात ज्यांनी सातत्याने अडचणी आणल्या तेच आज श्रेय घेण्यासाठी पुढे -आमदार बाळासाहेब थोरात

सध्याच्या सरकारमध्ये ताळमेळ नाही, आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर – सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे निळवंडे धरण आणि धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले. लाभक्षेत्रात पाणी पोहोचले. मात्र या कामात कोणत्याही प्रकारची मदत न करता केवळ सातत्याने अडचणी आणण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज निळवंडे धरण आणि कालव्याच्या कामाचे श्रेय घेत असल्याची टीका निळवंडे धरण आणि कालव्याचे जनक जननायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

नांदुरी दुमाला येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी थोरात यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. तसेच त्यांची मिरवणूक देखील काढली.

थोरात म्हणाले, १९८९ मध्ये भंडारदर्‍याच्या हक्काच्या पाण्याकरता मोठा लढा झाला. त्यानंतर निळवंडे धरण व कालव्यांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. आदर्शवत पुनर्वसन केले, मागील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोठा निधी मिळवला. त्यामुळे कालव्यांची कामे पूर्ण झाली. कोरोना संकटात शंभर फूट उंचीवर जाऊन म्हाळादेवी जलसेतूची पाहणी केली. अविरतपणे काम सुरू ठेवले. काम कोणी केले आहे, हे सर्व येथील जनतेला माहिती आहे.

ज्यांनी या कामात कधी मदत केली नाही, अडचणी निर्माण केल्या तेच लोक आता श्रेय घेण्यासाठी खटाटोप करत आहेत मात्र जनता त्यांना ओळखून आहे. संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करतो आहे. येथील सहकार, सुसंस्कृत राजकारण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धती ही राज्यासाठी आदर्शवत आहे.

तांबे म्हणाले, निळवंडे धरण आणि कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच झाले आहे. बाकीचे आता कितीही प्रसिद्धीसाठी खटाटोप करत असले तरी जनतेला सर्व काही माहिती असल्याने येथील जनता त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणारी नाही.

आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर…

सध्याच्या राज्य सरकारमध्ये कारभार करताना कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाही. एकमेकांवर होणारे शाब्दिक हल्ले चांगले नसून आपण लोकशाही व संविधानावर विश्वास ठेवून काम करत आहोत. त्यामुळे येत्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असेल असा विश्वास थोरात यांनी यावेळी व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 755
जलपूजन निळवंडे धरण बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.