Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवपुत्र संभाजी महानाट्य, दुसऱ्या दिवशीही जाणता राजा मैदान हाऊसफुल्लच! संगमनेरकरांचा महानाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद
सामाजिक

शिवपुत्र संभाजी महानाट्य, दुसऱ्या दिवशीही जाणता राजा मैदान हाऊसफुल्लच! संगमनेरकरांचा महानाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद

कलाकारांच्या भूमिकांमुळे प्रत्यक्षात शिवशाहीची अनुभूती
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्यात होत असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात शंभुराजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बुद्धीचातुर्य, पराक्रम आणि तेजापुढे कावेबाज अनाजीपंत निष्प्रभ ठरले. तर महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी प्राण्यांची आहुती देणाऱ्या छत्रपती शंभूराजाचा स्फूर्तीदायी इतिहास जिवंत झाला.

जाणता राजा मैदानावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महाराष्ट्राला संगमनेर करांचा परिसरातील नागरिकांची दररोज पन्नास हजारावर उपस्थिती लाभत असल्याने जाणता राजा मैदान या महानाट्यामुळे प्रथमत:च हाउसफुल्ल बघायला मिळत आहे.

महानाट्याच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाल शंभूराजांची आग्र्यावरून सुटका, शंभूराजांचे रायगडावर झालेले आगमन, यानंतर शंभूराजांचा शाही विवाह, शिवाजी महाराज आजारी असताना कारभाऱ्यांनी केलेला कावा हे पाहताना अंगावर रोमांच उभे राहत होते.

अत्यंत जोशपूर्ण आवेशात डॉ. अमोल कोल्हे यांनी सादर केलेली संभाजी महाराजांच्या भूमिका आणि प्रत्येक संवाद हा उपस्थितांच्या अंगावर शहारे आणत होता. तर कावेबाज अनाजी पंतांनी आखलेली खेळी, त्यात अडकलेल्या महाराणी सोयराबाई आणि संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा कट, यामुळे उपस्थितांमध्ये अनाजी पंतांची भूमिका करणारे महेश कोकाटे यांच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड राग निर्माण होताना दिसत होता.

तर महाराणी येसूबाईची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री स्नेहलता वसईकरणे सर्वांची मने जिंकली. जंजिरा मोहीम, मोगली फौजांचे महाराष्ट्रावर आक्रमण, सुमारे तीनशे कलाकारांच्या उपस्थितीत भव्य दिव्य झालेले हे महानाट्य आणि संभाजी राजेंना फितूरीने झालेली अटक, त्यांचे झालेले हाल यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले.

महानाट्याला होणारी गर्दी लक्षात घेत आयोजकांच्या वतीने रस्त्यावर एलडी स्क्रीनही लावण्यात आल्या होत्या. या महानाट्याचा सोहळा संगमनेरकरांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,112
बाळासाहेब थोरात महानाट्य शिवपुत्र संभाजी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर…

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026

संगमनेरात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात; १५७ बालगांधींच्या प्रभात फेरीने शहर दुमदुमले, गांधीजींच्या विचारांमुळे जगात भारताची मोठी ओळख: मा. आमदार डॉ. सुधीर तांबे

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.