Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

06/09/2026

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वेश्या व्यवसायावर छापा; पश्चिम बंगालमधील मुलीसह चौघींची केली सुटका! व्यवसाय करून घेणारी महिला अटकेत
गुन्हेगारी

वेश्या व्यवसायावर छापा; पश्चिम बंगालमधील मुलीसह चौघींची केली सुटका! व्यवसाय करून घेणारी महिला अटकेत

संगमनेरचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे पुन्हा चव्हाट्यावर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/02/2024Updated:08/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरी बाळेश्वर शिवारात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळताच त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांना कारवाईचे आदेश दिले. वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका पश्चिम बंगालमधील महिलेसह चार महिलांची सुटका केली असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तर काही ग्राहकांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर शिवारात वैशाली उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर शिवार, ता. संगमनेर) ही महिला स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता मुलींना पैशाचे आमिष देऊन त्यांना देह व्यापारास प्रवृत्त करुन स्वतःच्या मालकीच्या शेतामधील पत्र्याचे शेडमध्ये जागा उपलब्ध करुन देवुन त्यांचेकडुन देह विक्री व्यापार करुन घेत होती.

कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी एका बनावट ग्राहकाला पाठवले होते. येथे व्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वैशाली उत्तम फटांगरे हिच्या पत्र्याचे शेडवर छापा टाकला आणि चार पिडीत महिलांची सुटका केली. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत कुंटनखान्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह मोबाईल, रोख रक्कम, वाहने असा सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ, (नेम. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६/२०२४ नुसार भा.द.वि. कलम ३७०, ३४ सह स्त्रीया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे वैशाली उत्तम फटांगरे (वय ४८ वर्षे रा. पोखरी बाळेश्वर शिवार, ता. संगमनेर), सोमनाथ यादव सरोदे रा. आनंदवाडी ता. संगमनेर (फरार), दिपक उत्तम फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर ता. संगमनेर) यांनी संगनमत करुन ग्राहक आरोपी सागर वसंत लेंडे (वय २५ वर्षे रा. नांदुर खंदरमाळ ता. संगमनेर), रामदास अशोक मोरे (वय २९ वर्षे रा. धुमाळवाडी रोड, अकोले ता. अकोले) व शुभम बाळासाहेब मतकर (वय २२ वर्षे रा. निमज ता. संगमनेर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांच्यासह पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग, संतोष फड, ताई शिंदे, नेम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, संगमनेर व पो.उप.निरी. उमेश पतंगे, पोकॉ प्रमोद गाडेकर, घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुभाष बोडखे, नामदेव बिरे यांनी ही कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर घारगांव पोलीस स्टेशन हे करित आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 12,023
पोलीस कारवाई वेश्याव्यवसाय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांना ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र…

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.