Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही, आणि झुकणारही नाही; सर्वसामान्यांचा विकास साधणारे आमदार बाळासाहेब थोरात निष्ठावंत आणि राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व: खासदार डॉ. अमोल कोल्हे
महाराष्ट्र संवाद विशेष

महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही, आणि झुकणारही नाही; सर्वसामान्यांचा विकास साधणारे आमदार बाळासाहेब थोरात निष्ठावंत आणि राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व: खासदार डॉ. अमोल कोल्हे

प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत आमदार थोरात यांचे अभिष्टचिंतन
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/02/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा महाराष्ट्राला इतिहास आहे. इतिहास केवळ घोषणा देण्यासाठी नसून प्रेरणा देणारा असतो. इतिहासात हा महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही असे स्पष्ट करत गोरगरीब आणि सर्वसामान्यांचा विकास साधणारे आमदार बाळासाहेब थोरात निष्ठावंत आणि राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

येथील जाणता राजा मैदानावर आयोजित आमदार थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, सत्यशील शेरकर, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, मनीष मालपाणी, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होणाऱ्या आमदार थोरात यांनी शाश्वत विकासावर भर दिला. त्यांनी महाराष्ट्राचा सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासला. निष्ठावंत आणि सुसंस्कृत नेतृत्व अशी त्यांची राज्यात ओळख आहे. हे नेतृत्व आपल्या सर्वांना जपायचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे संभाजी महाराज यांचा समृद्ध परंपरेचा इतिहास या राज्याला आहे. संकटे आले की लढायचं असते, पळायचे नसते. हा स्वाभिमानाचा इतिहास प्रत्येकाने जोपासला पाहिजे. ज्या संविधानाने मतदानाचा अधिकार दिला ते संविधान आणि देश वाचवण्यासाठी काम करा. मतदान कक्षात गेल्यानंतर पाच मिनिट वेळ लागतो, बटन दाबण्यासाठी पाच सेकंद लागतात. मात्र या पाच सेकंदांनी पाच वर्षाचे देशाचे भवितव्य बदलते म्हणून अत्यंत काळजीपूर्वक मतदान करा.

हा अधिकार ज्या राज्यघटनेने दिला तो राज्यघटनेचा विचार सध्या धोक्यात आहे. राज्यघटना, संविधान आणि देश टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना लढायचे आहे. देशात सध्या महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, अनेकांचा रोजगार हिरावला जातो आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे पळवले जात आहेत. कांदा निर्यात बंदी केली आहे. फक्त जाहिरातबाजी आणि भाषणबाजीवर न जाता राज्याचा इतिहास समजून घ्या. देशाचे भवितव्य समजून घ्या असे सांगताना प्रत्येकाने देश वाचवण्यासाठी कटिबद्ध रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार थोरात म्हणाले, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा विचार आपण जपला आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने कायम आपल्यावर प्रेम केले. विकासामध्ये आपण कधीही राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेत विकासाचे काम केले. संगमनेरच्या जनतेमुळे आणि पक्षाच्या नेतृत्वामुळे राज्यात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आणि राज्यातील गोरगरीब जनतेसाठी केला.

निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण करून आता पाणी आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे. ही विकासाची वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे. मात्र यामध्ये काही लोक अडचणी निर्माण करून पाहत आहेत. अशा लोकांना वेळीच दूर करा. आज देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी वाढली. मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. काँग्रेस हा राज्यघटनेचा व संत परंपरेच्या समतेचा विचार असून या विचारावर आपण काम करत आहोत.

भावे म्हणाले, राज्याला बाळासाहेब थोरात व डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. प्रास्ताविक डॉ. तांबे यांनी केले. तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार थोरात यांचे जंगी स्वागत व अभिष्टचिंतन…

थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर सुमारे साठ हजारावर नागरिकांची उपस्थिती होती. आमदार थोरात व डॉ. कोल्हे यांचे आगमन होताच प्रचंड टाळ्यांच्या कडकटासह आकर्षक आतिषबाजी झाली. रस्त्यांच्या दुतर्फा आमदार थोरात यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित जनसमुदायाने मोबाईलचे टॉर्च ऑन करून तारांगणाचा नजारा दाखवत टाळ्यांच्या कडकडाटासह अभूतपूर्व स्वागतात थोरात यांचे अभिष्टचिंतन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 899
अभिष्टचिंतन डॉक्टर अमोल कोल्हे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी..; संगमनेरच्या वकिलाचे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिसमधून थेट पत्र!

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.