Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

06/09/2026

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गावठी कट्टा बाळगणारे तिघे सराईत नगर एलसीबीने पकडले!
गुन्हेगारी

गावठी कट्टा बाळगणारे तिघे सराईत नगर एलसीबीने पकडले!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर – नेवासा येथील संशयित आपल्या साथीदारांसह नगरमध्ये गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दबा धरून बसलेल्या नगर एलसीबीच्या पथकाने तिघा जणांना गावठी कट्यासह पकडले असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लखन भाऊसाहेब आल्हाट, लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे व अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट (तिघे रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. अहमदनगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हवाई दरीत्या शास्त्रीय बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संदीप दरंदले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, उमांकात गावडे यांचे पथक नेमत या पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.

नेवासा येथील संशयित आरोपी लखन आल्हाट हा आपल्या साथीदारांसह गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने नगरच्या सावेडी परिसरातील भिस्तबाग महालासमोर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींना पकडण्यासाठी तेथे सापळा लावला. मात्र तेथे आलेल्या आरोपींना पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडील मोटार सायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पथकाने दोघांना जागेवर पकडले तर तिसऱ्या आरोपीला पाठलाग करत पकडले.

पोलीस पथकाने पकडलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांना तीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे आणि सत्तर हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची होंडा कंपनीचे मोटार सायकल असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 785
एलसीबी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

महात्मा फुले जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेरात उद्या प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांचे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ विषयावर व्याख्यान

By Annant Ppangarkar06/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महात्मा फुले जन्मद्विशताब्दीच्या औचित्याने सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे…

आज रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

06/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.