संगमनेर – पाठ्यक्रमासह विविध कलाविष्कार आणि खेळांमध्ये नैपूण्य दाखवणार्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चमकले. जम्मु-काश्मिरमध्ये झालेल्या ९ व्या राष्ट्रीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सादरीकरण करताना ३५ सुवर्णसह तब्बल ४५ पदकांची लयलुट केली. स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर ध्रुव ग्लोबल स्कूलला राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक देवून गौरविण्यात आले आहे.
स्पोर्ट्स डान्सच्या वैयक्तिक प्रकारात ९ वर्षांखालील गटात तेजस्विनी क्षितीज मोहापात्रा हिने हर हर गंगे नृत्य सादर करीत सुवर्ण पदक मिळवले. १३ वर्षांखालील गटात रित चेतन राजपालने राधाराणी नृत्यावर तर, १७ वर्षांखालील गटात सौम्या सचिन जोशीने सुवर्ण पदक मिळवताना शाळेच्या कामगिरीचा आलेख उंचावला. युगल प्रकारातही हाच सिलसिला कायम राखतांना ध्रुवच्या तेजस्विनी व तेजस क्षितीज मोहापात्रा यांच्या जोडीने मिश्र लोकनृत्यावर सुवर्ण पदक पटकावले.

१३ वर्षांखालील लोकनृत्य प्रकारात रासरकेली नृत्य सादर करणार्या देवश्री अतुल देशमुख, आराध्या सुरेश राहाणे, काव्या स्वप्निल माळवे, रितिका सौरभ शहा, सोहम नेमीनाथ चौधरी, तनिष्का मोहन आहेर, श्रेयस श्रीगोपाळ भट्टड, ओव्या बाळासाहेब ठोंबरे, श्लोक प्रसाद मते आणि प्रणवी राजलिंगम मंने यांनी या प्रकारासह नवदूर्गा नृत्यातही उत्तम कामगिरी बजावताना सुवर्ण पदकाची कमाई केली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात दर्शी पंकज पटेल, समृद्धी राजेंद्र भाग्यवंत, मधुरा राजू कानवडे, आराध्या जनार्दन पुजारी, यशोधरा लक्ष्मीकांत नाईकवाडी, मनस्वी मारुती भांडकोळी, आदिती सुनील डेरे, ईश्वरी गोकुळ खताळ, रित चेतन राजपाल, सौम्या सचिन जोशी आणि श्रेया महेश मयूर या खेळाडूंनी शास्त्रीय नृत्यप्रकारात सुवर्ण तर लोकनृत्य प्रकारात रौप्य पदक मिळवतांना ध्रुव ग्लोबल स्कूलला प्रथम क्रमांक मिळवून दिला.
या संपूर्ण स्पर्धत सब ज्यनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर अशा तिनही गटात नेत्रदीपक प्रदर्शन करीत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने ३५ सुवर्ण आणि १० रौप्य अशी ४५ पदकांची लयलुट केली. सोनाली मोहापात्रा व गंधर्व पलाई यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



