Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; २७ व २८ फेब्रुवारीला निर्णय: रमेश चेन्नीथला
राजकारण

मविआच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात; २७ व २८ फेब्रुवारीला निर्णय: रमेश चेन्नीथला

भ्रष्टाचारमुक्त भारतच्या केवळ वल्गनाच; सर्व भ्रष्ट नेत्यांना भाजपाकडूनच सुरक्षाकवच : नाना पटोले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रीतपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.

राज्य निवड मंडळाच्या बैठकीआधी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले, महाराष्ट्रात मविआ आघाडी मजबूत आहे, आम्ही एकत्रपणे निवडणुका लढवत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मित्र पक्षांशी सातत्याने चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंबेडकर यांच्याशी चर्चा करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमती झालेली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे, लोणावळा येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात संघटन मजबुत करण्याविषय़ी चर्चा झाली आहे, मुंबई काँग्रेसच्या तयारीचा आढावाही घेतला जात आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, निवडणुका आल्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकांवर सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकल्या जात आहेत. परंतु भाजपाच्या एकाही भ्रष्ट नेत्यावर कारवाई केली जात नाही. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची वल्गना भारतीय जनता पक्षाने केली होती परंतु ज्या लोकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच भाजपात घेऊन भ्रष्टाचारयुक्त भाजपा केला आहे. अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटळ्याचा आरोप केला त्यांच्यावर छापे टाकले का? उलट त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री केले.

आदर्श घोटाळ्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला व त्यानंतर अशोक चव्हाणांना भाजपात घेऊन राज्यसभा खासदार केले. भाजपाने भ्रष्टाचारी लोकांनी सुरक्षाकवच दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ३०३ खासदारांमध्ये विरोधी पक्षातील जे १६५ जण आहेत तर काँग्रेसचे ६७ जण आहेत, ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. हे काय भ्रष्टाचारमुक्त भारत करणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेला  मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, AICC चे सचिव आशिष दुआ, माजी मंत्री अनिस अहमद, उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्त राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 552
उद्धव ठाकरे जागावाटप नाना पटोले मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026

संगमनेरकरांच्या अभिप्रेत असलेलेच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारणार! “दीड वर्षे खाती हातात असूनही वाढीव जागेचा प्रश्न सोडवला नाही; आता स्मारकाच्या कामात खोडा घालून संगमनेरकरांची दिशाभूल करू नका”

28/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू आणि मावा विक्री करणाऱ्या…

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.