Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

July 22, 2026

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची माजी नगरसेवकाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी
सामाजिक

तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची माजी नगरसेवकाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

संगमनेर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 26, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २६
कोल्हार-घोटी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र याच मार्गाचा भाग असलेल्या आणि शहरातून जाणाऱ्या तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण, डांबरीकरणासह अपूर्ण काम तातडीने करण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांकडे केली आहे.
तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा बहुतांशी भाग वाकचौरे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये मोडतो. संगमनेरमध्ये कोल्हार घोटी मार्गाच्या पूर्णत्वाचे काम बहुतांशी झाले असल्याने या कामातून तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा म्हणजेच मेनरोडचे काम झाले नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम वेगात असून याच रस्त्यावरील माळीवाडा ते अकोले नाका पूल हा रस्ता तसेच तीन बत्ती चौकापर्यंतचा भाग गेल्या एक वर्षापासून अपूर्ण आहे. यामुळे धुळीच्या प्रदूषणासह वाहनचालक, पादचाऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. यातच छोटे-मोठे अपघात देखील सातत्याने होत असल्याचे वाकचौरे यांनी म्हटले आहे.
प्रभागातील नगरसेवक या नात्याने नागरिकांनी या संदर्भातील तक्रारी वाकचौरे यांच्याकडे मांडल्या. तसेच संबंधितांकडून रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. या संदर्भात संबंधितांशी वेळोवेळी संपर्क करूनदेखील काम होत नसल्याने या मागणीसाठी माजी नगरसेवक वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले आहे. 
बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता ओ. बी. तांबारे यांनी तर संगमनेर नगर परिषदेच्यावतीने उपमुख्याधिकारी संजय पेखळे यांनी हे निवेदन स्वीकारले आहे. सदरचा अपूर्ण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, अशीदेखील अपेक्षा वाकचौरे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 719
कोल्हार घोटी रस्ता पीडब्ल्यूडी राजेंद्र वाकचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीत प्रस्तावित वाईन शॉपच्या स्थलांतराला स्थानिक व्यावसायिकांचा तीव्र विरोध; आमदार अमोल खताळ यांना निवेदन

July 14, 2026

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा; वृक्ष संगोपन हीच खरी ईश्वर सेवा: माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे आवाहन

July 14, 2026

असंघटित कामगार: श्रेय लाटणाऱ्यांवर संजय कोल्हे यांची घणाघाती टीका; सत्तेचा दुरुपयोग करून फोटो चिटकवण्याचे राजकारण दुर्दैवी

July 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये धडक मशाल मोर्चा

By अनंत पांगारकरJuly 22, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: ​दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर…

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

आज, बुधवार २२ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.