Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी संगमनेरची कार्यकारिणी केली बरखास्त आणि पुन्हा २४ तासात… भाजपातील अंतर्गत धुसफूस आली समोर!
राजकारण

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी संगमनेरची कार्यकारिणी केली बरखास्त आणि पुन्हा २४ तासात… भाजपातील अंतर्गत धुसफूस आली समोर!

पक्षात नवे जुने वाद उफाळला!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/03/2024Updated:08/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहमदनगर, दि. ७ मार्च
केवळ सत्तेसाठी भाजपमध्ये नव्याने आलेल्या लोकांमुळे जुन्या निष्ठावंतांवर अन्याय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या एका निर्णयामुळे संगमनेर भाजपाची अंतर्गत धुसफूस समोर आली, असे असले तरी स्वतःचाच निर्णय पुन्हा फिरविण्याची आफत भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर ओढावली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातही विखे व्हर्सेस भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमधील हा संघर्ष सातत्याने बघावयास मिळत आहे.
नव्या जुन्यातील संघर्ष आणि अंतर्गत वादामुळे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे दिसत आहे. बुधवारी संगमनेर तालुका मंडळ कार्यकारिणी रद्द केल्याचा स्वतःचाच दिलेला आदेश गुरुवारी पुन्हा २४ तासाच्या आत फिरविण्याची व आहे तीच कार्यकारिणी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याची आफत त्यांच्यावर ओढवली. यामागे जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा हात असल्याची चर्चा भाजप वर्तुळात रंगली आहे. या निर्णयामुळे अंतर्गत असलेला सुप्त असंतोष आता उफाळून आला आहे.
जिल्हाध्यक्ष लंघे यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वी संगमनेरची तालुका कार्यकारिणी जाहीर केली होती. यात वैभव लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यानंतरही पक्षात नवे-जुने असा वाद रंगला होता. निष्ठावांतांवर अन्याय झाल्याची ओरड त्यावेळी देखील करण्यात आली मात्र पक्षांतर्गत बाब असल्याने याची जाहीर वाच्यता होऊ शकली नाही. यातच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची, काही ठराविक लोकांनाच महत्त्व दिले जात असल्याची व काही ठराविक लोकांचा हस्तक्षेप वाढल्याची चर्चा देखील सुरू होती. जिल्ह्यातही विखे पिता पुत्रांविरोधात भाजपाच्या राम शिंदे यांनी उघडपणे विरोधाची भूमिका घेतली होती. शिंदे यांना पक्षांतर्गतच बळ मिळाल्याने त्यांनी नगर दक्षिणच्या उमेदवारीवरही आपला हक्क सांगितला.
संगमनेरमध्ये देखील असेच वादाचे पडसाद उमटत होते. दोन दिवसापूर्वी झालेल्या पक्ष बैठकीत देखील याचे पडसाद उमटल्याने व भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने टाकलेल्या दबावातून बुधवारी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या सहीने तालुका अध्यक्ष वैभव लांडगे यांना पत्र धाडण्यात आले. या पत्राद्वारे जिल्हाध्यक्षांनी संगमनेर तालुका कार्यकारिणी रद्द ठरविली होती.
मात्र याची दखल थेट वरिष्ठ पातळीवरून प्रदेश कार्यालयाकडून घेण्यात आली. आणि २४ तास उलटण्याच्या आतच जिल्हाध्यक्षांवर पुन्हा दुसरे पत्र धाडत वरिष्ठ नेते प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर पुढील निर्णय होईपर्यंत स्वतःच्याच निर्णयाला स्थगिती देत असल्याचे सांगण्याची आफत ओढावली. यामुळे भाजपमधील असंतोष समोर आला असून अंतर्गत पत्रप्रपंच व दबाव टाकणाऱ्या नेत्याबद्दल चर्चा रंगली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 14,307
भाजप विठ्ठलराव लंघे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.