Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना जमावाची बेदम मारहाण; संगमनेरात पुन्हा दोन धर्मियात वाद
गुन्हेगारी

चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना जमावाची बेदम मारहाण; संगमनेरात पुन्हा दोन धर्मियात वाद

पोलीस कारवाईकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/03/2024Updated:13/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. १३ मार्च, संगमनेर

संगमनेरच्या शांततेला गालबोट लावणारे जोर्वेनाका येथील प्रकरण न्यायप्रविष्ट होत नाही तोच आता पुन्हा एकदा कोल्हेवाडी-दिल्ली नाका रस्त्यावर जमावाकडून चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दंगल नियंत्रक पथकाची कुमक देखील मागविण्यात आली आहे.

मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला होता. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत असून दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत दुपारपर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

राहुल सोपान गुंजाळ (वय ३८ वर्ष, रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हा तरुण मंगळवारी सायंकाळच्या वेळी आपल्या दोन चिमुकल्या मुलींना घेऊन दुचाकी वरून कोल्हेवाडी रस्त्याने संगमनेरकडे येत होता. कोल्हेवाडी रोड-दिल्ली नाका परिसरात त्याच्या दुचाकीला पिकअप चालकाने कट मारला. कट मारल्यानंतर रागाने बघितल्याने दुचाकी थांबवून राहुल गुंजाळ कट का मारला असे विचारण्यासाठी पिकअप चालकाजवळ गेला असता पिकअप चालकाने डोळ्यात धुळ जात असेल तर गॉगल घाल, असे म्हणत वाद उत्पन्न करत त्याच्या दोन मुलींसमोरच त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार बघून तेथे मोठा जमाव जमला. जमलेल्या जमावाने देखील गुंजाळ याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यांच्या तावडीतून बचावलेल्या तरुणाने फोनवरून आपल्या काही मित्रांना मदतीसाठी बोलावून घेतले. घटनास्थळी आलेल्या त्याच्या मित्रांनादेखील जमावाकडून मारहाण करण्यात आली. यावेळी तरुणाच्या दोन्ही मुली मोठा आक्रोश करत होत्या. मात्र तरी देखील जमावाकडून राहुल गुंजाळ, संदीप गुंजाळ, अमोल गुंजाळ यांना मारहाण सुरूच होती. जमावाच्या तावडीतून बचावलेल्या आणि बेदम मारहाण झालेल्या तरुणांनी पोलीस ठाण्यात येत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदविण्याचे काम सुरूच होते. तर जखमी राहुल सोपान गुंजाळ, संदीप सोमनाथ गुंजाळ व अमोल संजय गुंजाळ यांना उपचार व वैद्यकीय तपासणीसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते.

दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केली या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता माहिती मिळू शकली नाही.

काही दिवसांपूर्वी शहरातील जोर्वेनाका परिसरात जोर्वे येथील अशाच किरकोळ कारणातून काही लोकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. याचे पडसाद देखील मोठ्या प्रमाणात संगमनेर मध्ये उमटले होते. शहरातील शांततेला गालबोट लावणारी या परिसरातील अतिक्रमणे पोलिसांनी पालिकेने तातडीने हटविली. अतिक्रमण आणि वाहन चालकांनी बेदरकारपणे उभी केलेली वाहने यामुळे या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. हा परिसर अतिक्रमण मुक्त करून तेथे पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. मात्र या चौकीला अद्यापही मुहूर्त लाभलेला नाही. असाच काहीसा प्रकार कोल्हेवाडी रोड ते दिल्ली नाका परिसरात अनुभवण्यास येत असून प्रशासन या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

चिमुकल्यांचा आक्रोश बघा व्हिडिओ…

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/03/VID-20240313-WA0005.mp4

मंगळवारी सायंकाळी दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड येथील घटनेसंदर्भात पोलीस विभागाकडून गंभीर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोपीवर कायदेशीर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येईल. कोणीही शहरात अफ़वा पसरवू नये. शांततेचे पालन करावे. सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,049
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.