Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आयुष्य समाजासाठी समर्पित – डॉ. जयश्री थोरात
सामाजिक

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आयुष्य समाजासाठी समर्पित – डॉ. जयश्री थोरात

सुमधुर भक्ती संगीतात अमृत उद्योग समूहाच्यावतीने भाऊसाहेब थोरात यांना आदरांजली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. १४ मार्च, संगमनेर

सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व आणि विचार घेऊन सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. तालुक्याच्या विकासाची रचनात्मक पायाभरणी करताना त्यांनी समाज विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून त्यांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अमृत उद्योग समूहाच्यावतीने आयोजित १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, गणपतराव सांगळे, संतोष हासे, रामदास वाघ, आर. बी. राहणे, रोहिदास पवार, प्रा. बाबा खरात, दत्तू थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, केशवराव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संदिपानी गुरुकुल घुलेवाडी येथील वारकरी विद्यार्थ्यांनी गायलेल्या सुमधुर भक्ती गीत आणि भावगीतांनी आदरांजली अर्पण करण्यात आली.

थोरात म्हणाल्या, भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान देत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहकारात मोठे काम केले. पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. मीटर हटावची चळवळ राज्यभर राबवली. सहकाराबरोबर शिक्षण आणि दुग्ध व्यवसायामधून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली. शिस्त, पारदर्शकता, काटकसर ही तत्व त्यांनी सहकारात रुजवली. आज ही तत्त्व देशाला दिशादर्शक ठरत आहेत. जीवनाच्या उत्तरार्धात त्यांनी दंडकारण्य अभियान राबवले. वाचनाची आवड असलेल्या दादांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. विविध क्षेत्रांचा मोठा अभ्यास असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संपूर्ण जीवन कार्य हे पुढील पिढ्यांसाठी सदैव मार्गदर्शक ठरेल.

यावेळी भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, विलास कवडे, रमेश गुंजाळ, ॲड. अशोक हजारे, डॉ. सुजित खिलारी, हौशीराम सोनवणे, तुषार दिघे, शांताराम कढणे, विजय राहणे, चंद्रकांत कडलग, रोहिदास सानप आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले. जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 995
जयश्री थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

प्रवराकाठी ‘एकविरा’चे ४५० शिलेदार; डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जन अन् निर्माल्य संकलन अभियान यशस्वी

25/09/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.