Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील उद्योजक ‘अमित पंडित’चा नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात असा आहे सहभाग, या कारणासाठी झाली अटक!
गुन्हेगारी

संगमनेरमधील उद्योजक ‘अमित पंडित’चा नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात असा आहे सहभाग, या कारणासाठी झाली अटक!

पंडितसह पत्नी सपना आणि मुलगा सात्विकचाही समावेश
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नगर अर्बन बँकेतील २९१ कोटीच्या घोटाळ्यात उद्योजक अमित पंडितचा ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा; पंडितचा भागीदार शुक्लाही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर!

दि. १९ मार्च, अहमदनगर

२९१ कोटीच्या बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यातील आरोपी म्हणून समोर आलेल्या संगमनेर मधील उद्योजक अमित पंडित (वय ५६) याने ३३ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला असल्याचे समोर येत आहे. शनिवारी दुपारी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केलेला पंडित सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून काय समोर येते याकडे सहकारातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.

३३ कोटींच्या घोटाळ्यात उद्योजक अमित वल्लभराय पंडितला नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २४ मार्चपर्यंत कोठडी दिली आहे. एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊन ते थकीत करायचे, कंपनीच्या नावाचे कर्ज फेडण्यासाठी फसवणूक करून पत्नी व मुलाच्या नावाने कर्ज घेऊन ते थकीत करायचे असा घोटाळा पंडितने घातल्याचे पोलीस तपासात व ‘फॉरेन्सिक ऑडिट’ अहवालात नमूद करण्यात आले आहे.

माजी केंद्रीय मंत्री, भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्याचा तपास सध्या पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत बँकेच्या माजी अध्यक्षांसह तीन संचालक, अधिकारी थकित कर्जदार अशा एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये बँकेत २९१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे व त्यामध्ये १०५ जण सहभागी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यात काही बड्या कर्जदारांचा समावेश असल्याने तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा तपास केला जात बँक बचाव कृती समितीने घेतलेल्या ठोस भूमिकेनंतर या तपासाला वेग आला असून आर्थिक गुन्हे शाखेने आरोपी भोवतींचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

बँकेतील मोठ्या थकबाकीत असलेल्या संगमनेरमधील उद्योजक व अमृतवाहिनी सहकारी बँकेचा माजी अध्यक्ष अमित पंडितला शनिवारी संगमनेरमधून अटक केली होती.

पंडितने घेतलेल्या कर्जाची रक्कम कोठे वापरली, त्यासाठी त्याला संचालक मंडळ व अधिकाऱ्यांमधील कोणाची मदत मिळाली याचा तपास पोलिसांना करायचा आहे, यासाठी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीच्या कार्यकाळात नेमकी काय माहिती समोर येते हे लवकरच स्पष्ट होईल.

उद्योजक पंडितने असा केला कर्ज घोटाळा…

संगमनेरमध्ये अमित पंडितची मे. परिस इस्पात प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीच्या यंत्रसामुग्री खरेदीसाठी त्याने अर्बन बँकेकडून ९ कोटीचे ‘टर्म लोन’ घेतले होते. तसेच त्याची पत्नी सपनाच्या मालकीच्या मे. पुष्कराज ट्रेडिंग कंपनीने याच ‘अर्बन’कडून १२ कोटीचे कॅश क्रेडिट घेतले. तर मुलगा सात्विक हा भागीदार असलेल्या मे. पुष्कराज कंपनीने ‘अर्बन’कडून स्वतंत्रपणे १२ कोटीचे कर्ज घेतले. अमित पंडितच्या परीस इस्पात कंपनीने कॉसमॉस बँकेकडूनही कर्ज घेतले होते, तेथे तो थकबाकीदार होता. कॉसमॉस बँकेच्या ‘ओटीएस’ योजनेसाठी अमित पंडितने अर्बनचे कर्ज वापरले व अर्बनमध्ये तो थकबाकीदार झाला. परीस इस्पातचे अर्बनकडील कर्ज फेडण्यासाठी त्याने पत्नी व मुलाने घेतलेल्या कर्जाची रक्कम वापरली. मात्र त्यापूर्वीच २८ मार्च २०१७ रोजी परीस इस्पात कंपनी मुलाच्या पुष्कराज कंपनीला विकण्याचा करार त्याने केला होता. त्याचबरोबर परीस इस्पातमार्फत नवा प्रकल्प उभारण्यासाठी त्याने अर्बनकडून फसवणूक करून कर्ज घेतले. पुष्कराज कंपनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार अत्यंत कमी असतानाही अर्बनला चुकीची माहिती देऊन त्याने १२ कोटीचे कर्ज घेतले. यात एकूण ३३ कोटीचा थकबाकीदार तो झाला. यामध्ये अमित पंडितचा परीस इस्पातमधील भागीदार मनोजकुमार विश्वास शुक्ला याचाही सक्रिय सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,999
अमित पंडित नगर अर्बन बँक पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.