Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

August 1, 2026

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या १८ हजार गुन्हेगारांवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई; तीन हजार परवाना धारकांकडील शस्त्रे काढून घेणार
गुन्हेगारी

निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या १८ हजार गुन्हेगारांवर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई; तीन हजार परवाना धारकांकडील शस्त्रे काढून घेणार

पोलिसांचा कारवाई संदर्भात आराखडा तयार
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 20, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. २० मार्च, अहमदनगर

१३ मे रोजी अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही मतदारसंघातील १७,८९९ गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधात्मक कारवाईचा स्वतंत्र आराखडा तयार केला आहे.

निवडणूक व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी या आराखड्यानुसार शिर्डी व अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७ हजारावर पोलीस व ४ हजारावर गृहरक्षक दलाचे जवान तैनात केले जाणार आहे.

दोन्ही मतदारसंघात संभाव्य उमेदवारांनी, राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने देखील कायदा सुव्यवस्था बिघडवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणाऱ्या गुन्हेगारांच्या याद्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी तयार केल्या असून दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर मोक्का, हद्दपारी, स्थानबद्धता अशी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. पोलीस ठाणे नेहा याचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दररोज घेतला जात आहे.

याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘रूटमार्च’ घेतला जात असून ठिकठिकाणी नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे. नाकाबंदी करण्यात आलेल्या ठिकाणी संबंधित विभागातील पोलीस उपाधीक्षक भेटी देऊन पाहणी करत आहेत. आचारसंहिता उल्लंघन रोखण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली असून अंमली पदार्थ, मोठी रोकड, अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक, अग्निशस्त्रे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याशिवाय संवेदनशील मतदान केंद्रांची यादी करण्यात आली असून तेथे देखील लक्ष ठेवले जाणार आहेत.

जिल्ह्यात तीन हजारावर लोकांकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना असून त्यांच्याकडे शस्त्रे जमा करून घेण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. विविध गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या जाणार असून फौजदारी दंड संहितेनुसार समाजकंटकांवर गाव ते जिल्हा पातळीपर्यंत प्रवेश बंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 548
आचारसंहिता पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात लपून-छपून उरकला बालविवाह; ५ जणांवर घारगाव पोलिसांत गुन्हा

July 30, 2026

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संगमनेर शहरात अद्यावत स्मारक उभारणार : माजी आमदार डॉ. सुधीर तांबे

By अनंत पांगारकरAugust 1, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा…

‘कडलग इन्व्हेस्टमेंट’च्या आर्थिक साक्षरता कार्यशाळेला गुंतवणूकदारांचा प्रतिसाद

August 1, 2026

शनिवार, १ ऑगस्ट २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल

August 1, 2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

July 31, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.