Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खासदार विखेंचा माफीनामा, पालकमंत्री विखेंची गुप्त खलबते आणि पक्षांतर्गत संवादाची मोहीम; विखेंसमोरील अडचणींचा डोंगर वाढताच!
राजकारण

खासदार विखेंचा माफीनामा, पालकमंत्री विखेंची गुप्त खलबते आणि पक्षांतर्गत संवादाची मोहीम; विखेंसमोरील अडचणींचा डोंगर वाढताच!

पालकमंत्री विखे पाटलांना नगरमध्ये अडकवून ठेवण्यात विरोधक यशस्वी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/03/2024Updated:20/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर, दि. २० मार्च, अहमदनगर

नगर दक्षिणमधून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने खासदार विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासमोर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी झालेल्या पहिल्याच भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार विखे यांनी कार्यकर्त्यांसमोर माफीनामा सादर केला होता. त्या पाठोपाठ पालकमंत्री विखे पाटील यांनी नाराज असलेल्या आमदार राम शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासोबत बंद दाराआड गुप्त खलबते केली. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री असलेल्या विखे पाटलांनी पक्षांतर्गत संवाद मोहीम साधण्यात सुरुवात केली असल्याने त्यांची ही मोहीम कितपत यशस्वी ठरते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. पक्षांतर्गत आमदार राम शिंदे यांनी देखील उमेदवारीवर दावा केल्याने उमेदवारी कोणाला मिळते याकडे मतदारसंघातील मतदारांचे व राजकीय धुरिनांचे लक्ष लागले होते. खासदार विखे विरुद्ध सारे असे चित्र मतदारसंघात निर्माण झाले होते. मात्र याही परिस्थितीत उमेदवारी मिळविण्यास विखे यशस्वी ठरले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात विखे विरोध एकवटला जाऊ लागला. ‘विखे विरुद्ध सारे’ विरोधक एकवटल्याने यातून निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन खासदार विखे यांचे वडील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुत्र डॉ. सुजय यांच्यासाठी स्वतः या मतदारसंघात लक्ष घातले आहे.

भारतीय जनता पक्षाने विखे यांची उमेदवारी जाहीर केले असली तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके यांची संभाव्य उमेदवारी व त्यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद लक्षात घेता व पक्षांतर्गत असलेल्या मोठ्या विरोधामुळे खासदार डॉ. सुजय विखे यांना ही निवडणूक सहजासहजी सोपी जाणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे पर्यायाने आपल्या सुपुत्राकडे कायम ठेवण्यासाठी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरले असल्याचे दिसते.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी पक्षाची पहिलीच बैठक संघटन मंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये पार पडली. या बैठकीत अनुपेक्षित व अचानक पणे खासदार सुजय विखे यांनी आपला माफीनामा पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर सादर केला.

पालकमंत्री विखे यांची कार्यपद्धती संपूर्ण नगर जिल्ह्याला परिचित आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या राजकारणात विखेंचा नेहमीच हस्तक्षेप राहिला आहे. त्यांच्या स्वतंत्र कार्यपद्धतीमुळे सध्या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष विखे व शिंदे या दोन गटात विभागला गेला आहे. शिंदेंचे देखील विधानसभा, नगरपंचायत, पंचायत समिती सभापती निवडीवळी  आमदार रोहित पवारांशी झालेली जवळीक, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीपासून विखेंसोबत बिनसले आहे. आपल्या पराभवाला त्यांनी विखे यांना जबाबदार धरले आहे. विखेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेला जिल्ह्यातील निष्ठावंत भाजपाचा गटही विखेंपासून काही अंतर राखून आहे. या पार्श्वभूमीवर विखे पिता पुत्रांसमोरील अडचणीचा डोंगर वाढत आहे.

त्यामुळे नगर मधील मेळाव्यापाठोपाठ लगेचच सायंकाळी पालकमंत्री विखे यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्येच बंद दाराआड दीड तास चर्चेच्या माध्यमातून खलबते झाली. खासदार सुजय विखेंचा माफीनामा, पालकमंत्री विखेंचे आमदार शिंदे सोबतची गुप्त चर्चा बरेच काही सांगून जाते. खासदार विखे यांना अचानक आपल्या माफीनामा सादर करावा लागणे आणि मंत्री विखे यांनी पक्षांतर्गत विरोधक आमदार शिंदे यांच्याशी बंद दाराआड केलेली चर्चा केवळ दोघांमधील चर्चा असल्याने व दोन्ही नेत्यांनी याबाबत मौन बाळगल्याने चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र ऐनवेळी आपले राजकीय कौशल्य वापरून ते परिस्थिती बदलू शकतात.

नगर दक्षिणमध्ये संभाव्य विरोधी उमेदवार असलेल्या आमदार लंके यांच्या मागे एकवटणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकांना थांबविण्याचे मोठे आव्हान सुरुवातीलाच पालकमंत्री विखे व खासदार सुजय विखे यांच्यासमोर निर्माण झाले असल्याचे दिसते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,834
डॉक्टर सुजय विखे राधाकृष्ण विखे राम शिंदे लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.