Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, करा सीव्हिजिल ॲपवर तक्रार!
प्रशासन

निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, करा सीव्हिजिल ॲपवर तक्रार!

पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद, निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/03/2024Updated:21/03/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. २१ मार्च, मुंबई

निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काही वेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे.

आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य… सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा… एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख… या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ… या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई… ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्यवाही करेल.

डाटा सुरक्षा… या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 542
आचारसंहिता निवडणूक आयोग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.