Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल: आमदार राम शिंदे
राजकारण

उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल: आमदार राम शिंदे

पक्षांतर्गत विरोधकांची नाराजी दूर करण्याचे विखें समोर आव्हान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/03/2024Updated:23/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि. २३ मार्च, अहमदनगर

पुन्हा उमेदवारी मिळाल्यानंतर पाच वेळा माफी मागायची वेळ यायला नको होती. अशी खासदार विखे यांचे नाव न घेता टिपणी करत भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणेतून पुन्हा उमेदवारी दिली असती तरी गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटनांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच माझी नाराजी कोणत्या मुद्द्यावर आहे हे स्पष्ट करेल, असे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना अंतर्गत मोठा विरोध होताना दिसत आहे. आमदार राम शिंदे यांच्यासह भाजपातील अनेक नेत्यांनी थेट विरोधाची भूमिका घेतल्याने निष्ठावंत भाजप विरुद्ध विखे यंत्रणा असे चित्र या मतदारसंघात विखे विरोधात विरोधी उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरण्यापूर्वीच निर्माण झाले आहे. दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील नगर मधील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा संपल्यानंतर आमदार राम शिंदे यांची भेट घेत दोघांमध्येच बैठक झाली ही बैठक शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी असे बोलले जाते. मात्र शुक्रवारी झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाथर्डी दौऱ्यावेळी देखील शिंदे यांनी अनुपस्थिती दर्शविली होती. यामुळे शिंदे अद्यापही नाराज असल्याचे स्पष्ट दिसते.

या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आता महत्त्वाचे विधान केले आहे. तिकीट जाहीर झाल्यानंतर पाच वेळा जाहीर माफी मागण्याची वेळ यायला नको होते अशी टिपणी विखे यांचे नाव न घेता शिंदे यांनी नगरच्या वाडिया पार्कमध्ये आयोजित राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना केली. ते म्हणाले, नगर दक्षिणेतून उमेदवारीसाठी मीही इच्छुक होतो. आधीही दोन निवडणुकांच्या काळात मी इच्छुक होतो. मात्र आता डॉ. विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोणत्या निकषावर मला उमेदवारी मिळाली नाही, हे मला सांगता येणार नाही. मात्र विखेंना उमेदवारी मिळाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील दिली आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्याशी केलेल्या चर्चेत मी काही मुद्दे उपस्थित केले होते. त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई भेट घेतली असल्याचे समजते. मात्र फडणवीस यांच्याकडून मला अजून पर्यंत काहीही निरोप आलेला नाही. पण नाराजी संदर्भात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्या स्तरावर चर्चा होईल, त्यानंतरच ते मुद्दे काय होते हे मी स्पष्ट करेन. मागे चार-पाच वर्षात घडलेल्या विविध घटना व मुद्द्यांचे निरसन होणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,074
डॉक्टर सुजय विखे राधाकृष्ण विखे पाटील राम शिंदे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची…

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.