Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिंदू जन आक्रोश मोर्चाला स्थगिती, प्रशासनाची माहिती… कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर!
प्रशासन

हिंदू जन आक्रोश मोर्चाला स्थगिती, प्रशासनाची माहिती… कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर!

शांतता बिघडविणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/03/2024Updated:25/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार दि. २५ मार्च, संगमनेर

गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या दोन समाजातील वादाच्या विविध घटनांमुळे सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या संभाव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या काही दिवसात संगमनेरात घडलेल्या विविध घटनांच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सतर्क असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाया केल्या जात आहेत. मोर्चाच्या आयोजकांच्या देखील काही मागण्यांवर गांभीर्याने विचार केला जात त्या दृष्टीने कार्यवाही देखील केली जात आहे. त्यामुळे बुधवारी (२७ मार्च) काढण्यात येणाऱ्या मोर्चाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

दरम्यान या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या घटना नंतर संगमनेरमधील तीन बत्ती चौक, कोल्हेवाडी रोड व जोर्वे नाका या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहे, असे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक स्वास्थ बिघडविनाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांवर विविध प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. अवैध व्यवसायाच्या संदर्भात पोलीस गांभीर्यपूर्वक लक्ष घालतील अशीदेखील माहिती देण्यात आली.

२८ मार्चला संगमनेरमध्ये निघणाऱ्या पारंपारिक शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात यापूर्वीचे पोलीस परवानगीचे रेकॉर्ड बघून परवानगी दिली जाईल, असे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी सांगितले.

(बातमीतील पत्रकार परिषदेचे छायाचित्र : प्रसाद सुतार, प्रेस फोटोग्राफर)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,464
धीरज मांजरे भगवान मथुरे राहुल वाघ शैलेश हिंगे सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.