Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विक्रीच्या उद्देशाने सुमारे चार किलो गांजा कुलर मध्ये दडवून ठेवणाऱ्यास पोलिसांनी पकडले!
गुन्हेगारी

विक्रीच्या उद्देशाने सुमारे चार किलो गांजा कुलर मध्ये दडवून ठेवणाऱ्यास पोलिसांनी पकडले!

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार दि. २६ मार्च

संशयित व्यक्ती स्वतःच्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त होताच नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेवगाव पोलिसांच्या मदतीने टाकलेल्या छाप्यात विक्रीच्या उद्देशाने कुलरमध्ये एका गोणीत दडवून ठेवलेला ३ किलो ९८० ग्रॅम वजन असलेला सुमारे ३९ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातल्या अवैध यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई सत्र सुरू आहे.

शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयित व्यक्ती सादिक शेख राहणार नवीन बाजारतळ तालुका शेवगाव हा कब्जात गांजा बाळगून स्वतःच्या घरात त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित व्यक्तीच्या घरी छापा टाकला असता घर जडतीमध्ये घरातल्या कुलरमध्ये पांढऱ्या रंगाच्या गोणीत उग्र वास येत असलेल्या बिया, बोंडे, काड्या, पान याचा संलग्न पाला आढळून आला.

आरोपीकडे या संदर्भात विचारणा केली असता त्याने हा गांजा असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सादिक फारुक शेख याच्या कब्जातून ३ किलो ९८० ग्रॅम वजन असलेला सुमारे ३९ हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला.

शेवगाव पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी अशोक ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सादिक शेख याच्या विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क) सह २० (ब) ii प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,080
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

By Annant Ppangarkar17/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवड…

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026

संगमनेरमध्ये युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी विशेष आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण शिबिर; आपत्कालीन प्रसंगात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा: डॉ. जयश्रीताई थोरात

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.