Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ॲक्शन मोडवर आलेल्या प्रशासनाचे कारवाया सत्र सुरूच, कारवायांचा धडाका
प्रशासन

ॲक्शन मोडवर आलेल्या प्रशासनाचे कारवाया सत्र सुरूच, कारवायांचा धडाका

कारवाईत सातत्य राखण्याची आवश्यकता
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार दि. २७ मार्च, संगमनेर

कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या काही घटना गेल्या महिनाभरापासून सातत्याने संगमनेरमध्ये घडत आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडताना दिसते. यामागील कारणांचा शोध घेत प्रशासनाने आता कारवायांचा धडाका लावला आहे.

पोलिसांनी नागरिकांच्या अर्जांची दखल घेत प्रचंड फौज फाट्यासह पोलिसी कारवाईचा मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. आरटीओला मदतीला घेत शहरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली. दिवसभर शहरातील जोर्वे नाका, दिल्ली नाका तसेच बस स्थानक अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार ६४ वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या.

सकाळपासून विविध कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये पायी पेट्रोलिंग, नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आल्या. आरटीओ विभागाच्यावतीने देखील अवैध वाहनांवर कारवाया करण्यात आल्या त्यात रिक्षांवर कारवाई करण्याचे प्रमाण अधिक आहे. कागदपत्रे नसणाऱ्या १५ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून अन्य २१ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून १ लाख ७२ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षा मोठ्या प्रमाणात गायब झाल्या होत्या.

याशिवाय संगमनेर शहरातील जुना महामार्ग, मुख्य बाजारपेठ या भागामध्ये ज्या दुकानदारांनी दुकानाच्या पुढील भागात अतिक्रमण केलेले आढळून आले त्या ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली. त्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. एकूण ३५ दुकानदारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १०२,११७ खाली कारवाई करण्यात आली असून या सर्व कारवायांचे प्रस्ताव न्यायालयामध्ये पाठविण्यात आले आहेत.

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना ग्रामीण भागातील नागरिकांनी तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जामध्ये जोर्वे, सुकेवाडी, निळवंडे, पिंपरणे, कनोली, वडगाव पान, कोल्हेवाडी इत्यादी भागात विनापरवाना रिक्षा व वाहने फिरत असतात त्यावर आरटीओ मार्फत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच संगमनेर शहर व परिसरात अशा विनापरवाना रिक्षा या अवैध वाळू वाहतूक, गोमांस वाहतुकीसाठी वापरल्या जातात अशी तक्रार देखील सातत्याने प्राप्त होत होत्या.

यातून भविष्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा रोष होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी आरटीओ विभागाच्या पथकाकडून संगमनेर शहरात विशेषतः बस स्थानक ते ज्ञानमाता विद्यालय, तीन बत्ती चौक ते रायतेवाडी फाटा, कोल्हेवाडी रोड, जोर्वे रोड, जमजम कॉलनी, भारत नगर, रहेमत नगर, मदिना नगर इत्यादी भागात कारवाई करावी आणि या कारवाई करता मदतीला आवश्यक ते मनुष्यबळ हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल असे पत्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांना दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 971
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

५० लाखांची कथित खंडणी अन् प्रशासकीय अनागोंदी: मुख्याधिकारी सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकाऱ्यांची कठोर कारवाई; नायब तहसीलदार मोहसीन शेख यांच्याकडे अतिरिक्त पदभार

24/09/2026

अन्न व औषध प्रशासनाची संगमनेरमध्ये कारवाई: २.६० लाखांचे संशयास्पद ‘काऊ घी’ जप्त, तर भेसळप्रकरणी दुग्ध केंद्राचा परवाना निलंबित

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.