Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोघा रुग्णांना चुकीचे रक्त चढविले; दोन परिचारिकांचे निलंबन
आरोग्य

दोघा रुग्णांना चुकीचे रक्त चढविले; दोन परिचारिकांचे निलंबन

रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. २८ मार्च

न्यूमोनिया झालेल्या दोन रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढविणाऱ्या दोन परिचारिकांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्याच्या औंध रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रिती ठोकळ आणि शांता मकलूर अशी तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही परिचारिकांची नावे आहेत.

दत्तू सोनाजी सोनवणे आणि दगडू कांबळे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी अगदी त्यांना न्यूमोनीया असल्याचे आढळून आले. त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी सामान्य पातळीपेक्षा कमी असल्याने, दोघांनाही त्वरित रक्तसंक्रमण आवश्यक असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण खलाटे यांनी काढला होता.

त्यानंतर त्यांनी नर्सिंग स्टाफला दोन्ही रुग्णांना रक्त देण्याचे निर्देश दिले. संबंधित परिचारिकांनी निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे यांचा रक्तगट ‘ए’ पॉझिटीव्ह असताना त्यांना ‘बी; पॉझिटिव्ह तर त्यांच्या शेजारील रुग्ण दगडु कांबळे यांना ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगट असताना ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त चढवले. या गंभीर चुकीमुळे दोन्ही रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. दोन्ही रुग्णांच्या रक्त गटाची अदलाबदल झाल्याने रक्त चढवीत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने हा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

या घटनेनंतर जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. येम्पल्ले यांनी मंगळवारी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत असे आढळून आले की, रक्तसंक्रमण करताना परिचारिका फोनवर बोलत होत्या. या निष्काळजी वर्तनामुळे रुग्णांना चुकीच्या रक्त पिशव्या देण्यात आल्या. त्यामुळे प्राथमिक तपासात परिचारिका दोषी आढळून आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोन्ही परिचारिकांचे २६ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) तरतुदीनूसार निलंबन करण्यात आले आहे.

निलंबन काळात सक्षम अधिका-यांच्या पुर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच खासगी नोकरी, व्यवसाय करता येणार नाही. इतर उद्योग, व्यापार केल्याचे निदर्शनास आल्यास गैरवर्तन समजून निर्वाहभत्ता मिळण्यास अपात्र ठऱवण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. येम्पल्ले यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 726
औंध रुग्णालय निलंबन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

15/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.