Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुंदर माझी शाळा! उपक्रमशील शिक्षिकेने शाळेला दिल्या डिजिटल पाट्या… शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान वाटायला हवा: अरुण भांगरे
शिक्षण

सुंदर माझी शाळा! उपक्रमशील शिक्षिकेने शाळेला दिल्या डिजिटल पाट्या… शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान वाटायला हवा: अरुण भांगरे

देशमुख मुळा शाळेचे योगदान राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/03/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार दि. ३१ मार्च

विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी शिक्षण दिशादर्शक ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळा भौतिक व शैक्षणिकदृष्ट्या विकसित व्हायला हव्या, त्याकरिता शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे. धांदरफळच्या देशमुख मळा शाळेने उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांमधून आणि लोकसहभागातून केलेली प्रगती ही शिक्षण क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन संगमनेर डाएटचे अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी केले.

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात द्वितीय क्रमांकाद्वारे दोन लाखाचे बक्षीस पटकावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा येथील शाळेत उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना ३२ डिजिटल पाट्या वितरित केल्या, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डिजिटल पाट्या मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे हरखून गेले.

अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश देशमुख तर व्यासपीठावर सरपंच उज्वला देशमाने, उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग, अरविंद सगभोर, अशोक देशमुख, मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे, अर्चना नाईकवाडी, रुपाली नाईकवाडी, तेजस्विनी देशमुख आदी उपस्थित होते.

भांगरे म्हणाले, आपल्याला जीवनामध्ये खऱ्या अर्थाने पुढे जायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. देशमुख मळा शाळेने शिक्षण क्षेत्रात जे योगदान दिलेले आहे ते खरोखर राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे.

उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. अक्षय खतोडे, संदीप बाळासराफ,अर्चना नाईकवाडी, तेजस्विनी देशमुख, रूपाली नाईकवाडी, अनिता हिरे, वैशाली देशमुख, सचिन कचेरिया, साधना गाडेकर, मच्छिंद्र लकारे आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय खतोडे यांनी तर आभार मुख्याध्यापक हनुमंत अडांगळे यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 658
वृषाली कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.