Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

19/11/2026

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर घेतला मोठा निर्णय; आता आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेकडे लक्ष!
न्यायालय

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावर घेतला मोठा निर्णय; आता आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेकडे लक्ष!

जामीन नाकारल्याने कुटे कुटुंबीयांना जेलवारी निश्चित
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/04/2024Updated:05/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार दि. ४ एप्रिल

दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पत्नी मुले आणि सुनांचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने देखील नाकारला आहे. त्यामुळे शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

संगमनेरच्या प्रतिष्ठित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटेसह सतरा आरोपींचा ८१ कोटी रुपयांचा अपहार समोर आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेने आपल्या घरातील कुटुंबीयांचा नातेवाईकांच्या मदतीने हा आर्थिक घोटाळा केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुख्य आरोपी असलेला कुटे आपल्या कुटुंबीयांसह गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेचा अपवाद वगळता कुटुंबातील अन्य सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या जिल्हा औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यात कुटे याची पत्नी शकुंतला व विमल भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे व सोनाली दादासाहेब कुटे यांचा समावेश होता. गेल्या काही महिन्यांपासून या जामीन अर्जावर निर्णय प्रलंबित होता. कुटे कुटुंबीयांच्या जामीन अर्जावरील निर्णयाकडे ठेवीदार, सभासद, सहकारातील जाणकार आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष लागले होते.

औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आल्याने आता आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या भाऊसाहेब कुटेसह त्याच्या कुटुंबीयांना अटक करून ठेवीदारांना दिलासा देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा न्यायालयासह आता खंडपीठानेही जामीन नाकारल्याने कुटे कुटुंबीयांना जेलवारी निश्चित झाली आहे. मात्र यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला आता जबाबदारीने दडपण झुगारून काम करावे लागणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 23,464
आर्थिक गुन्हे शाखा औरंगाबाद खंडपीठ दूधगंगा पतसंस्था भाऊसाहेब कुटे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपीला २४९ दिवसानंतर जामीन मंजूर

14/11/2026

कोर्टाचा दणका! कर्जप्रकरणी वादात शहर पोलीस स्टेशनच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; न्यायालयातून पोलीस निरीक्षकांना थेट नोटीस

30/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar19/11/20260

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या आजचे राशिभविष्य मेष…

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.