Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

04/10/2026

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हरित लवादाचा निर्णय… पद्मश्री विखे साखर कारखान्यातील स्फोटात मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना ६० लाखाची तर जखमींना अडीच ते पाच लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश
न्यायालय

हरित लवादाचा निर्णय… पद्मश्री विखे साखर कारखान्यातील स्फोटात मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना ६० लाखाची तर जखमींना अडीच ते पाच लाखाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार दि. ९ एप्रिल 

पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघात प्रकरणी मृत कामगारांच्या नातेवाईकांना साठ लाखापेक्षा अधिक तर जखमी कामगारांना प्रत्येकी अडीच ते पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बजावले आहे.

राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांनी विखे पाटील साखर कारखान्याने त्यांच्या शेतात परवानगी न घेता अवैधरित्या टाकलेल्या स्पेंट वॉशमुळे डाळिंब बागेला झालेल्या नुकसानी विरोधात महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कमिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्या अल्प कारवाईमुळे पवार यांना न्यायासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करावी लागली होती.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना प्रभावित क्षेत्रातील माती व भूगर्भातील पाण्याला झालेल्या नुकसानीचे अहवाल तसेच त्याची नुकसान भरपाई कशी करता येईल याचा अहवाल सादर करण्याचे फर्मावले होते. सुनावणी दरम्यान कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांच्या वकिलांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, ६ एप्रिल २०१६ रोजी पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघातामध्ये ३ बळी व १२ जणांना झालेली गंभीर दुखापत याकडे सहाय्यक संचालक औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभाग नगर यांनी केलेले तपासणीकडे लक्ष वेधले.

त्या अनुषंगाने सदर याचिकेमध्ये अंतिम निकाल सुनावताना विखे पाटील साखर कारखान्याच्या आवारात झालेल्या टँकर स्फोटांच्या अनुषंगाने प्रिन्सिपल बेंचने गठीत केलेल्या समितीचे अहवाल पाहता मयत झालेल्या ३ कामगारांच्या वारसांना ६० लाख रुपये रक्कम व इतर दुखापत झालेल्या कामगारांना प्रत्येकी अडीच ते पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून तीन महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश पारित केले आहेत.

ज्या दिवशी कारखान्यात टाकीचा स्फोट झाला होता त्यावेळी कामगारांचे मृतदेह जळत होते. दुसरीकडे कारखान्याचे चेअरमन राधाकृष्ण विखे व सुजय विखे हे शिर्डीमध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमात व्यग्र होते, असे पवार यांनी सांगितले असल्याचे दैनिक सामना ऑनलाईनने वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र संवाद न्यूजच्या वाचकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,100
प्रवरा साखर कारखाना राधाकृष्ण विखे हरित लवाद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

मी पक्ष सोडलेला नाही माझ्या विजयाचं श्रेय कोणीही उकळू नये; स्वीडनच्या खासदार नीला विखेंच्या स्पष्टीकरणाने विखेंचं हसं

25/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख— शिवसेना काल आज आणि उद्या

By Annant Ppangarkar04/10/20260

बाळासाहेब घोडके- शिवसेना हे चार अक्षरी नाव उच्चारताच मनात एक झंझावात उभा राहतो. वंदनीय बाळासाहेब…

रविवार विशेष लेख — फुले-आंबेडकर साहित्याला विष संबोधणारे बौद्धिक दलाल

04/10/2026

रविवार विशेष लेख — अस्थी नदीत विसर्जित करण्याऐवजी स्मृतींचे झाड लावू या!

04/10/2026

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.