Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीचे लोखंडे-विखे, महाविकास आघाडीचे वाकचौरे-लंके सारे एकाच माळेचे..! दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पक्ष बदलणार!
विश्लेषण

महायुतीचे लोखंडे-विखे, महाविकास आघाडीचे वाकचौरे-लंके सारे एकाच माळेचे..! दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पक्ष बदलणार!

आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडतो ना?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/04/2024Updated:13/04/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विश्लेषण | अनंत पांगारकर
शुक्रवार, दि. १२ एप्रिल 

अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी आणि माझा पक्ष योग्य हे सांगताना समोरचा उमेदवार आणि त्याचा पक्ष किती वाईट यावर प्रचारातून टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे. मात्र वास्तवता या दोन्ही मतदारसंघात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्या विरोधातील पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. ज्या पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर आपण टीका करतो त्याच घरात काही काळ आपण देखील सत्तेचा उपयोग घेतला, हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार विसरले आहेत.

नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतील प्रमुख चारही उमेदवारांना पक्ष बदलाचा दांडगा अनुभव आहे. ज्या पक्षातून आपण आता सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो तोच मागच्या पक्ष किती वाईट हे सांगण्याची चढाओढ या उमेदवारांमध्ये सुरू आहे. वारंवार पक्ष बदलाच्या अनुभवानंतर आता विकासाच्या नावाखाली सत्तेची ऊब कायम ठेवण्यासाठी पुन्हा नव्याने येणाऱ्या सत्ताधारी पक्षात कोलांटउड्या मारणार नाही, याची हमी कोणताच उमेदवार देत नसताना आता माझा पक्ष किती श्रेष्ठ आणि मीच कसा योग्य हे मतदारांवर बिंबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज सकाळी एका पक्षात प्रवेश केलेला नेता उद्या लोकांसमोर दुसऱ्याच पक्षाची भूमिका मांडताना दिसतो, त्यामुळे हाच नेता परवा कोणत्या पक्षात असेल याची शाश्वती मतदारांना राहिलेली नाही. या सर्वांचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे यांनी पक्ष बदलताच यांना नव्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्या. त्यांना मतदारांनी निवडूनही दिले.

या पार्श्वभूमीवर एकट्या नगर जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर नजर टाकली तरी त्यांचा पक्ष बदलाचा इतिहास समोर येतो. या सर्वांना वारंवार पक्ष बदलाचा मोठा इतिहास असल्याचे दिसते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीकडून डॉ. सुजय विखे (भाजप) आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (शिवसेना एकनाथ शिंदे गट) तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) समोरासमोर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले आहेत.

  • काँग्रेस-भाजपा असा प्रवास असलेले नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या कुटुंबीयांनी म्हणजेच बाळासाहेब विखे, राधाकृष्ण विखे, शालिनीताई विखे यांनी काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस-भाजपा असा दीर्घ पक्षीय प्रवास केला. या सर्वच पक्षात त्यांना मानाची स्थाने आणि पदे मिळाली.
  • त्यांच्या विरोधातील उमेदवार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून आमदारकी उपभोगली असली तरी तत्पूर्वी ते शिवसेना-राष्ट्रवादी-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) असा त्यांचा प्रवास राहिला.
  • शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे यांचा प्रवास देखील असाच रंजक आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे भाजपकडून आमदार असलेल्या लोखंडे यांनी भाजप-मनसे-शिवसेना आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) असा राजकीय प्रवास केला.
  • लोखंडेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे एकीकडे प्रशासकीय सेवेत होते. मतदार संघाच्या पुनर्रचनानंतर शिवसेनेने त्यांना या मतदारसंघातून संधी दिली आणि ते खासदार देखील झाले. शिवसेना काँग्रेस भाजपा आणि पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा वाकचौरे यांचादेखील राजकीय प्रवास आहे.

त्यामुळे मतदारांना आपण सुज्ञपणे विचार करून ठरविण्याची वेळ आली आहे की आपण आपला लोकप्रतिनिधी निवडताना आपला लोकप्रतिनिधी त्याच्या सध्याच्या पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे का?

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 16,173
डॉक्टर सुजय विखे निलेश लंके भाऊसाहेब वाकचौरे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लोकसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट सदाशिव लोखंडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

पराभूत होऊनही लोकनेते बाळासाहेब थोरातांचे राजकीय वलय संपत का नाही? वाचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले विश्लेषण…

30/09/2026

रविवार विशेष लेख — बोगस जीडीपीचा फज्जा…!

06/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.