Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २०१९ च्या निवडणुकीत बहिष्कार टाकलेल्या संगमनेरच्या या वाड्यांमध्ये शिर्डीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा… जाणून घ्या, नेमकं काय घडलं!
महाराष्ट्र संवाद विशेष

२०१९ च्या निवडणुकीत बहिष्कार टाकलेल्या संगमनेरच्या या वाड्यांमध्ये शिर्डीच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा… जाणून घ्या, नेमकं काय घडलं!

यावर्षी मतदार मतदान करणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. १५ एप्रिल 

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी रविवारी संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी व सतीची वाडी या मतदान केंद्राना अचानक भेट दिली. भेटीत त्यांनी गावातील मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पेमरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

संगमनेर तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीत सुमारे तीनशे मतदार आहेत. पेमरेवाडी शिर्डी लोकसभा व अकोले विधानसभा मतदारसंघात येते. पेमरेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. २०२४ च्या निवडणूकीपूर्वी या गावाला जोडणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे.

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत या वाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून यावर्षी लोकसभा निवडणूकीत मतदान करणार असल्याचे सांगितले आहे.

Advt

संगमनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या सतीची वाडीचे (शिंडेवाडी) ४९७ मतदार आहेत. सतीची वाडीचे मतदार केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून गणले जाते. निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सतीची वाडीला भेट देत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

मतदान केंद्राना भेट दिल्यानंतर कोळेकर यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. याप्रसंगी संगमनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व निवडणूक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सर्वोच्यच्या चार आणि उच्च न्यायालयाच्या सतरा निवृत्त न्यायाधीशांचे सरन्यायाधीशांना पत्र; चिंता व्यक्त करत म्हटले, न्याय व्यवस्थेवरील दबाव…

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,371
जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.