Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाचा जनतेची माफी मागण्याचा आदेश; काय आहे प्रकरण
न्यायालय

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाचा जनतेची माफी मागण्याचा आदेश; काय आहे प्रकरण

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/04/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. १६ एप्रिल 

योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत जनतेची माफी मागण्याचे निर्देश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले.

पतंजलीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल १७ ऑगस्ट २०२२ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांनी काही आजार बरे होत असल्याचा दावा करण्यात आला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने या दाव्यावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून ॲलोपॅथी औषधांवर टीका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. योग गुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी मागितलेल्या बिनशर्त माफीची दखल घेताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही चांगले काम करत असाल पण तुम्हाला ॲलोपॅथीला बदनाम करण्याचा अधिकार नाही. सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या बिनशर्त माफीचीही दखल खंडपीठाने घेतली.

मागच्या आठवड्यात १० एप्रिलला खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली, तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 575
पतंजली बाबा रामदेव सर्वोच्च न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.