Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी मतदार संघात पहिल्याच दिवशी नामनिर्देशन पत्राची अशी राहिली स्थिती… नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात
राजकारण

शिर्डी मतदार संघात पहिल्याच दिवशी नामनिर्देशन पत्राची अशी राहिली स्थिती… नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात

१८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शिर्डी, गुरुवार दि. १८ एप्रिल 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. १३ मे) मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (दि. १८ एप्रिल) सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केला नाही. मात्र पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले.

गुरूवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली. तसेच याच दिवसापासून २५ एप्रिल २०२४ पर्यंत ११ ते ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी, ३८ शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, १ ला मजला, राहाता तालुका प्रशासकीय इमारत, राहाता येथे नामनिर्देशन पत्र नाममात्र शुल्कात दिले जात आहेत.

नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी रूपये १२,५००/- असून सामान्य वर्गातील उमेदवारासाठी रूपये २५००० इतकी अनामत रक्कम आहे. अनामत रक्कम जमा करून नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यापुढे शपथ घेतील.

नामनिर्देशन पत्राची छाननी दि. २६ एप्रिलला सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत आहे.

नामनिर्देशन अर्जात नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप केले जाईल. त्यासह जे उमेदवार अपक्ष उभे होतील त्यांनाही स्वतंत्र चिन्ह दिले जाईल. अपक्ष उमेदवारांसाठी दहा सूचक असणे आवश्यक आहे. २९ एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

उमेदवारास त्यांचे नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाच्या “सुविधा” या वेब पोर्टलवर ही उपलब्ध आहे. याद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. अशा प्रकारे सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे येऊन प्रत्यक्षरीत्या सादर करावी लागणार आहे.

Advt

००००००००

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,229
उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.