Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगर पोलिसांचा संगमनेरात कत्तलखान्यावर छापा; २९०० किलो गोवंश मांसासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
गुन्हेगारी

नगर पोलिसांचा संगमनेरात कत्तलखान्यावर छापा; २९०० किलो गोवंश मांसासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

स्थानिक पोलिसांचे अपयश की एलसीबीचा हस्तक्षेप!
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/04/2024Updated:19/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि.१९ एप्रिल

गोवंश जनावरांच्या हत्येसाठी प्रसिद्ध असलेल्या संगमनेरमधील कत्तलखान्यावर शुक्रवारी पहाटे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २९०० किलो गोवंश मांसासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कारवाईत तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एलसीबीच्या कारवाईनंतर संगमनेरमधील कत्तलखाने केवळ कागदावर बंद असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलिसांना हे कत्तलखाने बंद करण्यात पूर्णतः अपयश आले आहे.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संगमनेर मधील जमजम कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापूसाहेब फोलाने, गणेश भिंगारदे, सचिन लोंढे, अतुल लोटके, संतोष खैरे, रणजीत जाधव, रवींद्र घुंगासे, सागर ससाने, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे आदींच्या पथकाने पहाटे जमजम कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला.

एलसीबीच्या पथकाने कारवाईदरम्यान पकडलेली वाहने आणि आरोपी

या कारवाईत पथकाने रेहान शेरखान पठाण (वय २१ वर्षे रा. रहेमत नगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हरून मनियार (वय ३४ वर्ष रा. मोमीनपुरा, छोटी मज्जिद जवळ, संगमनेर) आणि राझीक अब्दुल रज्जाक शेख (वय ३८ वर्ष रा. अलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) या तिघा संशयीतांना अटक केली आहे. तर प्रत्येकी सहा लाख रुपये किमतीच्या एम. एच. १७ बी.डी. ४१८२ व एम. एच. ११ ए.जे. ३२४६ या दोन पीकअप त्यामध्ये अनुक्रमे १५०० व १४०० किलो गोमांस, दोन हजार रुपये किमतीचा एक सत्तूर, दोन सुरे व एक कुऱ्हाड असा एकूण २० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन दत्तात्रय अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 965
एलसीबी कत्तलखाना कारवाई पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.