Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एलसीबी पाठोपाठ पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाचा संगमनेरातील कत्तलखान्यावर छापा; पाच लाखाचे गोमांस आढळले
गुन्हेगारी

एलसीबी पाठोपाठ पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाचा संगमनेरातील कत्तलखान्यावर छापा; पाच लाखाचे गोमांस आढळले

एक फरार, दोघे पकडले... चार दिवसांची पोलीस कोठडी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि.२२ एप्रिल

गेल्या आठवड्यात अहमदनगर एलसीबीच्या पथकाने संगमनेरात कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात गोमांसासह सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्या पाठोपाठ सोमवारी रात्री अकरा वाजता संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने पुन्हा येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी जिवंत गोवंश जनावरांच्या केलेल्या कत्तलीचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे अडीच हजार किलो गोमांस बाजारात विक्रीला जाण्यापूर्वीच पकडले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सलीम जान मोहम्मद कुरेशी (वय १९ वर्ष, सुभाष नगर, कोपरगाव हल्ली रा. मदिना नगर, संगमनेर) व कैश अशपाक कुरेशी (वय २२ वर्ष, रा. मदिना नगर, संगमनेर) दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना संगमनेरच्या न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. तर कारवाई दरम्यान काशीफ असद कुरेशी (रा. मदिना नगर, संगमनेर) हा पळून गेला असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती अशी, सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील मदिनानगर भागात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना माहिती मिळाली होती. पोलीस उपाधीक्षकांच्या आदेशावरून पोलीस कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी जात तपासणी केली असता एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तिघेजण गोवंश जनावराची कत्तल करताना आढळून आले. कारवाई दरम्यान दोघे पोलिसांच्या हाती लागले तर एक जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.

कारवाई पोलिसांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे अडीच हजार किलो गोमांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे कुऱ्हाडी, सूरे जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 746
कत्तलखाना कारवाई पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला…

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.