अहमदनगर, बुधवार दि.२४ एप्रिल
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात बुधवारी सात उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार प्राजक्त तनपुरे यांचा देखील समावेश आहे. याशिवाय अकरा इच्छुकांनी अठरा नामनिर्देशन पत्र नेल्याची माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टु रिकॉल पार्टी), रवींद्र लिलाचंद कोठारी (अपक्ष), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), महेंद्र दादासाहेब शिंदे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), मच्छिंद्र राधाकिसन गावडे (अपक्ष) व छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार महायुतीचे डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.


