अहमदनगर, शुक्रवार दि.२६ एप्रिल
शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी नंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. तर प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांच्यासह सहा उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत पार पडली. छाननीमध्ये हनुमंत देविदास पावणे (अपक्ष), शरद बाबुराव माघाडे (अपक्ष), ज्ञानदेव कारभारी पाडळे (अपक्ष), विश्वनाथ श्रीरंग शेळके (अपक्ष), छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) व प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
तर छाननी नंतर निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवार पुढीलप्रमाणे…
उमाशंकर श्यांमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), सुजय राधाकृष्ण विखे पाटील (भारतीय जनता पार्टी), गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ. योगिता प्रविण चोळके (अपक्ष), सुर्यभान दत्ताात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (हिंदू एकता आंदोलन पार्टी), अनिल गणपत शेकटकर (अपक्ष), मुक्ता प्रदीप साळुंके (इंन्सारनियत पार्टी), मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), आरती किशोरकुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लीकन पार्टी), दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी), निलेश साहेबराव लंके (अपक्ष), रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी), गंगाधर हरिभाऊ कोळेकर (अपक्ष), प्रविण सुभाष दळवी (अपक्ष), मनोरमा दिलीप खेडकर (अपक्ष), बिलाल गफुर शेख (अपक्ष), प्रतिक अरविंद बारसे (अपक्ष), राणी निलेश लंके (अपक्ष), परवेज उमर शेख (ऑल इंडिया मजलिस-इत्तेळहादुल मुस्लिमीन), कैलाश निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), भागवत धोंडीबा गायकवाड (समता पार्टी), ॲड. महंमद जमीर शेख(अपक्ष), भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी), नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष), कोठारी रवींद्र लिलाचंद (राष्ट्रीय जनमंच एस), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), महेंद्र दादासाहेब शिंदे (अपक्ष), गावडे मच्छिंद्र राधाकिसन (अपक्ष).



