Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मविआचे नेते बाळासाहेब थोरात यांचे मोठे विधान… त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती होणार!
राजकारण

मविआचे नेते बाळासाहेब थोरात यांचे मोठे विधान… त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती होणार!

महायुतीच्या निष्क्रिय उमेदवाराला आव्हान...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/04/2024Updated:27/04/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
अकोले येथील सभेत बाेलतांना महाविकास अघाडीचे नेते बाळासाहेब थोरात
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि. २७ एप्रिल

सध्या देशात आणि राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील, नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, अशा ‘त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती पुढील काळात होणार आहे’ असा सज्जड इशारा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

अकोले (अहमदनगर) येथे शुक्रवारी महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, कॉ. डॉ. अजित नवले, अमित भांगरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे, संभाजी ब्रिगेडचे संदीप कडलग, काँग्रेस पक्षाचे शिवाजी नेहे, जगदीश चौधरी, राजू पाटील, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

थोरात यांचे भाषण सुरु असतांनाच या सभेसाठी परवानगी आणि इतर गोष्टी मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खूप त्रास दिल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने बोलतांना थोरात म्हणाले, त्रास देणाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे. ४ जूननंतर त्रास देणाऱ्यांच्या दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे. भाजपला निवडून द्यायचं नाही, असा येथील जनतेचा निर्णय झाला आहे. भाजपची सत्ता ही लोकशाहीला आणि राज्यघटनेला घातक असल्याने भाजपविषयी शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मनात आस्था राहिलेली नाही. कामगार, अल्पसंख्यांक यांच्याविषयी सत्ताधाऱ्यांना सहानुभूती नाही.

मणिपूरच्या अत्याचारावर देशाचे पंतप्रधान अवाक्षर हे बोलले नाहीत. साधी भेट देखील त्यांनी दिली नाही किंवा राष्ट्रपतींचा सन्मान केला जात नाही. अशा सत्ताधाऱ्यांना आदिवासीविषयी आस्था असणार नाही हे दिसून येते. हा देश हुकूमशाहीच्या वाटेने चालला असून राज्यघटना धोक्यात आली आहे. कोरियामधील हुकूमशहा किम जोंगच्या हुकूमशाहीत जनतेवर जे दिवस आले आहेत ते तुमच्यावर येऊ देऊ नका. त्यामुळे निवडणुकीत चांगला निर्णय घेणे हे तुमच्या हातात आहे.

महायुतीच्या निष्क्रिय उमेदवाराला आव्हान…

महाविकास आघाडीला राज्यात ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करीत ते म्हणाले की, विरोधी उमेदवार गेल्या दहा वर्षात कधीही मतदारसंघात फिरकला नाही. जनतेच्या संपर्कात आला नाही. फक्त निळवंडेच्या कामाचे श्रेय घेण्याचा उपद्व्याप ते करीत आहेत. एक रुपयाचा निधीदेखील त्यांनी आणला नाही. त्यांनी निधी आणला असेल तर तोंडी नाही तर पेपरवर दाखवा, असे आव्हानच थोरात यांनी विरोधी उमेदवाराला दिले.

लग्नाला यायचं हं!
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,202
अकोले बाळासाहेब थोरात महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

By Annant Ppangarkar05/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जर भारनियमन करण्याचे शासनाचे किंवा महावितरणचे अधिकृत परिपत्रक अथवा…

अवैध धंद्यांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’नुसार कठोर कारवाई करा: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियांचे संगमनेरात निर्देश

05/09/2026

आज शनिवार, ०५ सप्टेंबर! जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

05/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.