Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात
राजकारण

“81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून सरकारची मोठी फसवणूक; महिलांच्या विश्वासाला तडा” – बाळासाहेब थोरातांचा घणाघात

लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आलेल्या सरकारनेच महिलांना दिला धोका
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | प्रतिनिधी

राज्यातील तब्बल ८१ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र ठरवून महायुती सरकारने महिलांच्या विश्वासाला तडा दिला असून ही महिलांची सरळसरळ फसवणूक असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवून मतदान केले म्हणूनच हे सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेत आल्यानंतर त्याच महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने केले आहे. ८१ लाख महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे त्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरण्यासारखे आहे, असे थोरात म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केले. महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा ढासळत चालली असून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप त्यांनी केला. भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांतील नेत्यांचे स्वागत होत असल्याकडे लक्ष वेधत थोरात म्हणाले, सर्वांनाच भाजपमध्ये घेतले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस मूळ भाजप कार्यकर्तेच शोधावे लागतील. देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू असून भविष्यात केवळ काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष उरतील अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

काँग्रेस पक्षात नव्या पिढीला मोठी संधी असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात काँग्रेस नवीन नेतृत्व घडवेल आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला. राज्यातील सध्याचे राजकारण दुर्दैवी व चिंताजनक असल्याचे सांगत, या घडामोडींकडे जनतेने सजगपणे पाहिले पाहिजे. लोकशाहीतील बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारीही जनतेचीच आहे, असे आवाहन थोरात यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 447
अपात्र लाभार्थी टीका बाळासाहेब थोरात भाष्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

बिबट्याच्या भीतीने शेततळ्यात पडून ११ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जवळे कडलगमध्ये तीव्र संताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी दुःख व्यक्त करत आर्थिक मदतीची केली मागणी

29/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.