Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी, अहमदनगर दक्षिणची लढत ‘वंचित’मुळे रंगणार शिर्डीत २० तर अहमदनगरमध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात
राजकारण

शिर्डी, अहमदनगर दक्षिणची लढत ‘वंचित’मुळे रंगणार शिर्डीत २० तर अहमदनगरमध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात

अखेरच्या दिवशी शिर्डीत दोघांची तर अहमदनगरमध्ये अकरा जणांची माघार! प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह हे उमेदवार आजमावणार आपले नशीब
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/04/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अनंत पांगारकर | सोमवार, दि.२९ एप्रिल

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिर्डी आणि अहमदनगरमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. वंचितच्या उमेदवारांमुळे या मतदारसंघातील लढती चर्चेत आल्या आहे. शिर्डीमध्ये दोघांनी तर अहमदनगरमध्ये तब्बल अकरा जणांनी माघार घेतल्याने शिर्डीत २० तर अहमदनगरमध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उतरले आहे.

दोन्ही मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. दोघात तिसरा आल्याने या मतदार संघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे. शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब वाकचौरे आणि महायुतीच्या सदाशिव लोखंडे यांच्यासाठी तर अहमदनगर मध्ये वंचित चे उमेदवार दिलीप खेडकर महाविकास आघाडीच्या निलेश लंके आणि महाविकास आघाडीचे सुजय विखे यांची गणित बिघडविणार आहे. या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी तारक ठरते की मारक हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

अहमदनगरमधून सोमवारी एमआयएमचे उमेदवार परवेज उमर शेख, हिंदू एकता आंदोलन पार्टीचे सुदर्शन शितोळे, इन्सानियत पार्टीच्या मुक्ता साळुंखे, यांच्यासह बहुचर्चित ठरलेल्या निलेश साहेबराव लंके, गिरीश तुकाराम जाधव, डॉ. योगिता प्रवीण चोळके, जहीर युसुफ जकाते, राणी निलेश लंके, मनोरमा दिलीप खेडकर, प्रतीक अरविंद बारसे, प्रा. सुनीलराव पाखरे यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. निलेश लंके सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखेंचे डावपेच हाणून पाडण्यात यशस्वी झाले आहे.

याउलट शिर्डी लोकसभा मतदारसंघात मात्र शेवटपर्यंत सना मोहम्मद अली सय्यद व संजय हरिश्चंद्र खामकर या अवघ्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. अन्य उमेदवारांची समजूत काढण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार सपशेल अपयशी ठरले. याशिवाय या मतदारसंघात या दोन्ही प्रमुख उमेदवारांना विरोधात वंचितसा तगडा उमेदवार प्रकाश आंबेडकरांनी मैदानात उतरवला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच विजयाच्या हवेत असलेल्या या दोन्ही उमेदवारांचा फुगा फोडण्यात वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यशस्वी ठरल्या आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील हे आहेत उमेदवार…

  1. भाऊसाहेब राजाराम वाकचौरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  2. रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी)
  3. सदाशिव किसन लोखंडे (शिवसेना)
  4. उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी)
  5. ॲड. नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी)
  6. भारत संभाजी भोसले (समता पार्टी)
  7. राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी)
  8. अभिजीत अशोकराव पोटे
  9. अशोक रामचंद्र आल्हाट
  10. नचिकेत रघुनाथ खरात
  11. विजयराव गोविंदराव खाजेकर
  12. गंगाधर राजाराम कदम
  13. चंद्रकांत संभाजी दोंदे
  14. प्रशांत वसंत निकम
  15. गोरक्ष तानाजी बागुल
  16. भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे
  17. रवींद्र कलया स्वामी
  18. सतीश भिवा पवार
  19. ॲड. सिद्धार्थ दीपक बोधक व
  20. संजय पोपट भालेराव (सर्व अपक्ष)

असे आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार…

  1. सुजय राधाकृष्ण विखे (भारतीय जनता पार्टी)
  2. निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)
  3. उमाशंकर श्याम बाबू यादव (बहुजन समाज पार्टी)
  4. आरती किशोर कुमार हालदार (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)
  5. कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष)
  6. डॉ. कैलाश निवृत्ती जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी)
  7. रवींद्र लीलाचंद कोठारी (राष्ट्रीय जनमंच सेक्युलर)
  8. दत्तात्रेय आप्पा वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी)
  9. दिलीप कोंडीबा खेडकर (वंचित बहुजन आघाडी)
  10. भागवत धोंडीबा गायकवाड (समता पार्टी)
  11. मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी)
  12. रावसाहेब शंकर काळे (बहुजन मुक्ती पार्टी)
  13. भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी)
  14. शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी)
  15. अमोल विलास पाचुंदकर
  16. मच्छिंद्र राधाकिसन गावडे
  17. गोरख दशरथ आळेकर
  18. गंगाधर हरिभाऊ कोळेकर
  19. नवशाद मुंशीलाल शेख
  20. प्रवीण सुभाष दळवी
  21. बिलाल गफूर शेख
  22. महेंद्र दादासाहेब शिंदे
  23. ॲड. मोहम्मद जमीर शेख
  24. अनिल गणपत शेखर व
  25. सूर्यभान दत्तात्रेय लांबे (सर्व अपक्ष)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 733
अहमदनगर लोकसभा उमेदवार लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.