Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

June 10, 2026

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सुजय विखेंचे साडेतीन कार्यकर्तेच कारभार पाहतात, जिल्हा उपाध्यक्ष खेडकर यांची भाजपला सोडचिठ्ठी
राजकारण

सुजय विखेंचे साडेतीन कार्यकर्तेच कारभार पाहतात, जिल्हा उपाध्यक्ष खेडकर यांची भाजपला सोडचिठ्ठी

निवडणूक काळात पदाधिकाऱ्याने दिला भाजपाला धक्का
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 1, 2024Updated:May 1, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, दि.१ मे – पाथर्डी

खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे या भाजपमधील आमच्या सारख्या जुन्या निष्ठावंतांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर यांनी सोमवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खेडकर म्हणाले, विखे यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून त्यांच्या एकाही कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावले नाही. त्यांचे साडेतीन कार्यकर्तेच त्यांचा कारभार पाहतात. गेल्या पस्तीस वर्षांपासून मी भाजपचे काम करतो मात्र माझ्यासह जे पंकजा मुंडे यांचे काम करतात त्यांना भाजपमध्ये नंतर आलेले राजळे व विखे हे सातत्याने डावलण्याचे काम करतात.

लग्नाला यायचं हं!

ह्या दोघांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शेवगावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मी दोन वेळा भाजप तालुकाध्यक्ष असताना मला विचारून कधीही कोणताही निर्णय राजळे यांनी घेतला नाही, उलट माझे गाव असलेल्या भालगावमध्ये सुद्धा निधी देताना मला विश्वासात घेण्यात आले नाही. तुम्ही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहात असे म्हणून आम्हाला सापत्न भावाची वागणूक देण्यात आली.

लोणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले मात्र या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले नाही. आता निवडणूक आली म्हणून त्यांनाच प्रचारसभेला बोलवत आहेत. भाजप हा ओबीसी केडरचा पक्ष असल्याचे सांगतो प्रत्यक्षात मात्र माझ्यासारख्या ओबीसीवर अन्याय करण्याचे काम केले जात आहे.

विखे व राजळे हे भाजपात नंतर आले असून त्यांना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचे काहीही देणे घेणे नाही. ते त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या गटातटाचे नेतृत्व करतात. आपल्यावर अन्याय होतो आहे हे अनेकवेळा आपण पक्षश्रेष्ठीना सांगितले मात्र उपयोग न झाल्याने आपण भाजपला रामराम करत असून लवकरच अनेक कार्यकर्ते सुद्धा भाजपातुन बाहेर पडणार आहेत. पुढे काय निर्णय घ्यायचे हे वेळ आल्यावर ठरवूत असे शेवटी खेडकर म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 729
पाथर्डी भाजप राजीनामा लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

अकोले तालुक्यात भीषण स्फोट; मासेमारीसाठी नेण्यात येणाऱ्या स्फोटकांचा दुचाकीवरच स्फोट, एक जण गंभीर जखमी

By अनंत पांगारकरJune 10, 20260

अकोले: अकोले तालुक्यातील औरंगपूर फाटा येथे आज दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण स्फोट झाल्याची…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण : नंदकुमार पोवार

June 10, 2026

धार्मिक कार्यानंतर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

June 10, 2026

आज बुधवार, १० जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 10, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.