Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालकमंत्री विखे पाटील म्हणाले… मनात किंतु परंतु नको, मी पालकमंत्री, माझ्या इभ्रतीचा प्रश्न… महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजे, नाहीतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी…
राजकारण

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले… मनात किंतु परंतु नको, मी पालकमंत्री, माझ्या इभ्रतीचा प्रश्न… महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजे, नाहीतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी…

प्रतिस्पर्ध्यांवर राजकीय टीका टिप्पणी टाळत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिले निवडणूक हाताळण्याचे धडे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/05/2024Updated:01/05/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार दि.१ मे – संगमनेर

आता मनातील किंतु-परंतु नको, मी पालकमंत्री आहे माझ्या इभ्रतीचा प्रश्न आहे. उगीच लाईटली घेऊ नका, हसण्यावारी नेऊ नका, शंभर टक्के काम करून संगमनेरमधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजेत. पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. गटातून मताधिक्य मिळणार नसेल तर उमेदवारी मागू नका असा थेट इशाराच राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला.

संगमनेरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभासाठी मंत्री विखे बुधवारी आले होते. यावेळी ते बोलत होते. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले, निवडणूक थोड्या दिवसांवर आली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्याची गरज आहे. बूथ, गण आणि गटनिहाय नियोजन करून घरोघर पोहोचा. मतदार संघात काही मोठ्या नेत्यांच्या सभा होतील त्यासंबंधी काय नियोजन करायचे ते आम्ही करू. तुम्ही कामाचे गती वाढवा मतदारांपर्यंत पोहोचा. निळवंडे कालव्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी आले होते, त्यामुळे ज्या मतदारसंघात मोदी आले त्या मतदारसंघाचा खासदार हा महायुतीचाच झाला पाहिजे. ही आपल्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे या तालुक्यामधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळायलाच हवे.

संघटितरित्या काम केल्यास आपण या मतदारसंघातून देखील महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देऊ शकतो. आपल्यातील अंतर्गत मतभेद नंतर बघू. निवडणूक प्रचारादरम्यान गट, गाव सोडू नका. जबाबदारीने काम करा असे देखील ते म्हणाले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/05/VID-20240501-WA0075.mp4
लग्नाला यायचं हं!

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,441
महायुती राधाकृष्ण विखे लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अधिकृत आदेश नसताना भारनियमन कोणाच्या दबावाखाली? महावितरणच्या कारभारावर काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकरांचा हल्लाबोल

05/09/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

By Annant Ppangarkar05/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्गणीच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. पुढच्या…

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.