Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » उत्पादन शुल्क विभागाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक ११ हजाराची लाच घेताना पकडला!
गुन्हेगारी

उत्पादन शुल्क विभागाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक ११ हजाराची लाच घेताना पकडला!

नाशिक लाच लुचपत विभागाची कारवाई
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/05/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, दि. २ मे

देशी दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच बिअर बार परमिट रूमवर कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडून ११ हजाराची लाच घेणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक लाच लुचपत विभागाने कोपरगावमध्ये पकडला.

खलील खुर्शीद शेख (वय ४० वर्षे, रा. खडकी रोड, चर्चचे समोर, कोपरगाव, ता. कोपरगाव जि. अहमदनगर) असे लाचखोर भरारी पथकाच्या सहाय्यक दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. शेख याच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नासिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या पथकाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कोपरगावमध्ये ही कारवाई करण्यात आली. जाधव यांच्या सापळा पथकात पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल यांचा समावेश होता.

२५ वर्षीय तक्रारदार शासनमान्य देशी दारू विक्रेता असून त्याचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी श्रीरामपूर भरारी पथकाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक शेख याने अकरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने शेख याच्या विरोधात नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीचे पडताळणी झाल्यावर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचखोर शेख याला पकडण्यासाठी कोपरगावमध्ये सापळा लावला होता.

तक्रारदाराकडून ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेख याला पथकाने रंगेहात पकडले. शेख याच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,136
कोपरगाव लाचखोरी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.