गुरुवार, दि. २ मे
राज्यातील हाय व्होल्टेज लढतीमधील एक प्रमुख लढत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये होत आहे. भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात ही लढत होत आहे. ही लढत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
या मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी काल महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. विखे यांना दिलेला पाठिंबा हा या मतदारसंघात महा विकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभेचे माजी उपसभापती आणि पारनेरचे माजी आमदार असलेल्या विजय औटी यांनी पक्षाचा आदेश न पाळल्याने पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निवडणूक काळात पक्षविरोधी भूमिकेमुळे निलंबित होणारे विजय औटी पहिलेच माजी आमदार आहे.
विजय औटी यांचे पक्षातून निलंबन केल्याची माहिती माध्यमांना शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी एका प्रेस नोटद्वारे दिली आहे.


