Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पत्नीच्या खून प्रकरणी पतीसह चौघांना जन्मठेप
Uncategorized

पत्नीच्या खून प्रकरणी पतीसह चौघांना जन्मठेप

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ३ मे

पोटगीपोटी शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात दावा करणाऱ्या पत्नीचा न्यायालयाच्या परिसरात चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीसह चार जणांना वैजापूर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोयिऊद्दीन एम. ए. यांनी हा निकाल दिला. ३ ऑक्टोबर २०२० मध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेत केशरबाई कारभारी गवळी (८०) रा. भिंगी बोरसर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी कारभारी किसन गवळी (८०), त्याची दोन मुले भारत कारभारी गवळी (४७), अतुल कारभारी गवळी (२१) सर्व रा. घायगाव ता. वैजापूर व त्यांचा नातेवाईक रघुनाथ जगन्नाथ सरोवर (३०) रा. गारज यांना दोषी ठरवून खुनाच्या आरोपखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी, कारभारी किसन गवळी याने मयत केशरबाई यांच्याशी फारकत घेऊन बिजलाबाई या दुसऱ्या महिलेशी लग्न केले. कारभारी याने पोटगीपोटी केशरबाई यांना चार एकर ३३ गुंठे जमीन दिली होती. पण या जमिनीचा ताबा मिळाला नसल्याने केशरबाईने जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी वैजापूर न्यायालयात दावा दाखल केला होता.

३ ऑक्टोबर २०२० रोजी केशरबाई या आपला नातू किसन तांबे याच्या सोबत न्यायालयात पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ वकिलांची वाट बघत बसल्या असताना चौघे आरोपी तेथे आले व त्यातील तिघांनी दोघांना धरले व कारभारी गवळी याने सोबत आणलेल्या चाकूने केशरबाई यांच्यावर सपासप वार करून ठार केले.

तपास अधिकारी आर. बी. जाधवर यांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी अकरा साक्षीदार तपासले. साक्षी पुराव्यानंतर सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध केल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम मोयीयोद्दीन एम. ए. यांनी सर्व आरोपीना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 993
जिल्हा व सत्र न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

22/07/2026

चॉपर हल्ल्यातील संशयिताला संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन…

24/01/2026

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुनावली अद्दल घडवणारी शिक्षा

11/01/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर…

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026

आज शुक्रवार ११सप्टेंबर — असे आहे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

11/09/2026

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.