Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुनावली अद्दल घडवणारी शिक्षा
न्यायालय

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने सुनावली अद्दल घडवणारी शिक्षा

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सविता गव्हाणे यांनी या प्रकरणात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 11, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

नाशिक: सात वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. किशोर दिनकर सोनवणे (वय २९, रा. महाकाली चौक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना २ मे २०१९ रोजी नाशिकमधील सिडको परिसरातील साईबाबानगर, महाकाली चौक येथे घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी घरासमोर इतर मुलांसोबत खेळत होती. यावेळी आरोपी किशोर सोनवणे याने घराच्या गच्चीवरून एक उशी खाली फेकली. मुलीला ती उशी घेऊन गच्चीवर येण्यास सांगून, तिच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर, अंबड पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. भानूप्रिया पेठकर यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सिद्ध केले की, आरोपीने अत्यंत वाईट हेतूने मुलीला गच्चीवर बोलावून हे कृत्य केले होते.

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सविता गव्हाणे यांनी या प्रकरणात सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. पीडिता, पंच आणि साक्षीदारांची साक्ष तसेच पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत ५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 550
जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘दत्तधाम’च्या गडगे महाराजाच्या पत्नी अन् मुलाला दिलासा; सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

July 22, 2026

रविवार विशेष लेख — लातोंके भूत बातोंसे नही मानते…!

July 5, 2026

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

July 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.