Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एसएमबीटीत आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण; एन्डोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसह ईआरसीपी चाचण्यांना सुरुवात
आरोग्य

एसएमबीटीत आता पोटावरील क्लिष्ट प्रक्रीयांसह अवयव प्रत्यारोपण; एन्डोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसह ईआरसीपी चाचण्यांना सुरुवात

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/05/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. ०३ मे

गेल्या काही दिवसांपूर्वी पोट व यकृत (लिव्हर) संबंधित आजार असलेल्या रुग्णांना इतरत्र जाऊन उपचार घ्यावे लागत होते. रुग्णसंख्येचा वाढता आलेख यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नुकताच एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ पोटविकार विभाग सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी व ईआरसीपी प्रक्रियांना सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा आठवड्यातून दोन दिवस नाशिक येथील क्लिनिकमध्येही सुरु करण्यात आली असून याठिकाणी रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. याबाबतची माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव-घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये नाशिकसह जळगाव, भुसावळ, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, जालना, भंडारा गोंदियासोबतच ठाणे, पालघर व मुंबईच्या विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. याठिकाणी पूर्णवेळ पोटविकार तज्ञ याठिकाणी उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. मात्र, गेल्या महिन्यापासून तज्ञ व अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव आंबर्डेकर पूर्णवेळ याठिकाणी उपलब्ध झालेले असून पोटावरील वेगवेगळ्या स्कोपीसह क्लिष्ट शस्रक्रिया याठिकाणी ते करू लागले आहेत.

सद्यस्थितीत एसएमबीटीमध्ये अद्ययावत गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपीसह ईआरसीपीद्वारे विना शस्त्रक्रिया पोटासंबंधित आजारांचे निदान व उपचार करणे सहज शक्य झाले आहे. यासोबतच अत्याधुनिक फायब्रोस्कॅन ज्याद्वारे लिव्हरची इजा ओळखता येते ही सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांवर याठिकाणी शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत तर योजनेत न बसणाऱ्या रुग्णांवर याठिकाणी अल्पदरांत उपचार केले जात आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत २५ पेक्षा अधिक स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी विभाग सुरु झाले आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलला नुकतेच सर्वोच्च रुग्णसेवेचा मापदंड समजल्या जाणाऱ्या एनएबीएच संस्थेची प्राथमिक मान्यतादेखील मिळाली आहे.

रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची (लिव्हर ट्रान्सप्लांट) माहिती मिळावी यासाठी डॉ. आंबर्डेकर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दररोज व नाशिक येथील बाह्यरुग्ण विभागात अवयव प्रत्यारोपणावर विशेष मार्गदर्शन करत आहेत. यासोबतच पचनसंस्थेशी निगडित सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे रुग्णांची गैरसोय यामुळे टळलेली आहेत.

नाशिक क्लिनिकमध्ये बाह्यरुग्ण सेवा... नाशिकमध्ये दर बुधवार आणि शुक्रवारी पोटविकार विभागाची बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात आली आहे. यादरम्यान, पोटासंबंधित आजारांवर सल्ला व मार्गदर्शन केले जाते. यासोबतच अतिशय कमीत दरांत रुग्णांना औषधेदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

पोटविकाराची लक्षणे… पोटामध्ये वेदना होणे, गिळायला त्रास होणे, गिळता न येणे, अचानक वजन कमी होणे, भूक कमी लागणे, छातीमध्ये व पोटामध्ये जळजळ होणे, वारंवार अतिसार (डायरिया) होणे, बद्धकोष्ठता, उलट्या व रक्ताच्या उलट्या होणे, काळी संडास, संडासातून रक्त येणे, कावीळ, पित्ताशयातील खडे व पित्तनलीकेतील खडे, यकृताचे विकार, स्वादूपिंडाचे विकार, पोटातील आतड्याला सूज येणे इत्यादी.

आजार अंगावर काढू नका… एसएमबीटी हॉस्पिटलच्या पोटविकार विभागात यकृत रुग्णांमध्ये गळ्याखाली फुगलेल्या नसांवर बॅडिंग करणे, अन्ननलिकेत किंवा पोटामध्ये गिळलेल्या पिन, चुंबक, बॅटरी, काटे व तत्सम गोष्टी पोटातून काढणे, अन्ननलिकेचा अडथळा दूर करणे, अन्ननलिका, पोट, यकृत, स्वादुपिंड, मोठे आतडे यांचा कर्करोग-निदान व उपचार करणे, अन्ननलिका व पोट व आतडे यातून होणारा रक्तस्राव रोखणे, निदान व उपचार, पित्तनलिका व स्वादुपिंडातील खडे व अडथळे ईआरसीपीद्वारे दूर करणे इत्यादी उपचार केले जात आहेत. आजार अंगावर न काढता तत्काळ उपचार घेतल्यास कुठलाही आजार बरा होतो – डॉ. प्रणव आंबर्डेकर, पोटविकार तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 549
आरोग्य एस एम बी टी हॉस्पिटल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

19/07/2026

मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; आगामी दौरे आणि कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलले

04/07/2026

केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे बदापूर येथील शेती धोक्यात; विहिरींचे पाणी दूषित, तलावातील मासे मृत

11/06/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar10/09/20260

annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.