Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डीत प्रमुख उमेदवारांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह, आहे त्या पक्षाशी एकनिष्ठ राहणार की पुन्हा गद्दारीचा शिक्का मारून घेणार!
राजकारण

शिर्डीत प्रमुख उमेदवारांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह, आहे त्या पक्षाशी एकनिष्ठ राहणार की पुन्हा गद्दारीचा शिक्का मारून घेणार!

समस्या, प्रश्न व त्यावरील उपाय योजना मांडण्याऐवजी व्यक्तिगत टीका टिप्पणीवर उमेदवारांचा भर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. ४ मे | अनंत पांगारकर

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नऊ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र प्रमुख उमेदवारांचा प्रचार अद्यापही थंडच आहे. अपवाद वगळता पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही निरुत्साह दिसत असून उमेदवारांच्या भूमिका मतदारांसह कार्यकर्त्यांना देखील संभ्रमात पाडणाऱ्या आहे. निवडून जाणारा आणि पराभूत होणारा उमेदवार आता तरी आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहत दिल्या घरी सुखी राहणार की पुन्हा पदाच्या लालसेने पक्ष बदलणार याची गॅरंटी मात्र कोणीही देताना दिसत नाही. 

आजी-माजी खासदारांसह या मतदारसंघात प्रथमताच प्रमुख महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या महिला उमेदवारामुळे सुरुवातीची दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी बनली आहे. यामुळे सुरुवातीपासूनच विजयाच्या हवेत असलेल्या आजी-माजी खासदारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. प्रमुख उमेदवारांपैकी आजी-माजी खासदार असलेल्या उमेदवारांमागे राज्यातील बड्या नेत्यांचे पाठबळ आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांची मदार या नेत्यांवर आहे. तर या दोन्ही उमेदवारांची गणित बिघडवणारा तिसरा उमेदवार मात्र जनतेच्या म्हणजेच मतदारांच्या बळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याचे दिसते.

आजी-माजी खासदारांना सुरुवातीला सोपा आणि एकतर्फी वाटणारा (दोघांनीही मतदारांना गृहीत धरल्याने) विजय तिसऱ्या उमेदवारामुळे कोणाच्या पारड्यात जातो याची उत्सुकता येथील मतदारांना लागली आहे. तीनही उमेदवारांना आपला विजय दृष्टिक्षेपात दिसत असल्याने आणि त्यांच्या वारंवार पक्ष बदलाच्या भूमिकेमुळे अद्यापही या मतदारसंघात मात्र पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह संचारल्याचे दिसत नाही.

मतदार संघातील समस्या, प्रश्न यावर कोणताही उमेदवार बोलत नसून केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मात्र करत आहे. तसेच केवळ उमेदवारीसाठीच या तिन्ही उमेदवारांनी आपल्या मूळच्या पक्षाशी फारकती घेत नव्या पक्षाशी नवा घरोबा केल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र आहे तेथेच असून केवळ नाईलाजाने पक्ष बदलू उमेदवारांचा झेंडा हाती घेत त्यांच्या विजयासाठी या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहे.

या मतदारसंघात खासदारकीसाठी प्रथमतःच प्रमुख महिला उमेदवार मैदानात उतरल्याने दोघात तिसरा… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या तिरंगी लढतीत महिला उमेदवाराने बाजी मारली तर या मतदारसंघाला पहिल्यांदाच महिला खासदार मिळू शकते. सध्या तरी कोणाचा कोणाला फायदा होणार आणि कोण कोणाचे नुकसान करणार हे अद्यापही अनुत्तरीत आहे.

अशी आहे उमेदवारांची पक्षीय एकनिष्ठता…

महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पक्षीय प्रवास भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि शिवसेना (शिंदे गट) असा राहिला आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पक्षीय प्रवास शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, अपक्ष आणि आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असा राहिला आहे. 

या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत तिसऱ्या वंचित बहुजन आघाडी कडून उभे असलेल्या महिला उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा राजकीय पक्षीय प्रवास काँग्रेस पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी असा राहिला.

यामुळे निवडणुकीनंतर जर पुन्हा काही राजकीय उलथापालथ झाली तर कोण कुठे असेल याविषयी मात्र अनिश्चितता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 863
उत्कर्षा रुपवते पक्षनिष्ठा भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा सदाशिव लोखंडे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.