Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विखेंना सत्ता बदलाचे वारे लवकर कळतात, मात्र त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
राजकारण

विखेंना सत्ता बदलाचे वारे लवकर कळतात, मात्र त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात

वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, दि. ५ मे 

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना सत्ता बदलाचे वारे लवकर कळतात, असा टोला लगावत ‘त्यांना पक्षात घेताना निश्चितपणे मला विचारले जाईल’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पाथर्डी (अहमदनगर) मधील एका सभेत शनिवारी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे दोन वेळा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्याचा तारीख आणि वेळेनिशी दाखला देत बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही वॉर्निंग बेल असल्याचे व थोरात यांचा आता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता बळावली असल्याचे म्हटले होते.

या संदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नगरमध्ये आलेल्या थोरात यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, या संदर्भात मलाही थोडी थोडी माहिती मिळाली होती, मात्र सगळ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. विखे यांना सत्ता बदलाचा अंदाज लवकर येतो. मात्र त्यांचा पक्षप्रवेश मला विचारल्याशिवाय होणार नाही.

या अगोदर देखील या कुटुंबाने गेल्या पंधरा वर्षात अनेक वेळा पक्ष बदललेले आहे. जिथे सत्ता तिथे जातात असा देखील टोला थोरात यांनी यावेळी विखेंना लगावला.

नगरची जागाही महाविकास आघाडीला मिळेल…

राज्यभरात महाविकास आघाडीला अतिशय चांगले वातावरण आहे. विदर्भ, मराठवाड्यातील क्वचित एखाद्या जागेचा अपवाद वगळता उर्वरित जागा महाविकास आघाडीला मिळतील. नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सामान्य कुटुंबातून आलेले आहे. अनेक संस्था ताब्यात असलेल्या, आर्थिक ताकद आणि मोठे यंत्रणा असलेल्या एका धनदांडग्या उमेदवारासोबत त्यांची लढत आहे. त्यांच्या पराभवासाठी भाजप आणि उमेदवाराने या मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्याचा सपाटा लावला याचा अर्थ लंके यांचा विजय येथून निश्चित असल्याचे देखील थोरात म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,862
अहमदनगर लोकसभा निलेश लंके प्रकाश आंबेडकर बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे लोकसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.