Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय, नगर अर्बनच्या संचालकांना दणका, ठेवीदारांना दिलासा… काय आहे नेमकं प्रकरण
न्यायालय

औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय, नगर अर्बनच्या संचालकांना दणका, ठेवीदारांना दिलासा… काय आहे नेमकं प्रकरण

औरंगाबाद खंडपीठाचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या बँका पतसंस्था संदर्भात मोठा निर्णय
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/05/2024Updated:06/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, दि. ६ मे

नगर अर्बन बँकेसंदर्भातील एका महत्त्वाच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने सोमवारी निर्णय दिला. हा निर्णय येताच बँक बचाव समिती व ठेवीदारांनी जल्लोष केला आहे.

नगर अर्बन बँकेसंदर्भात माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल झालेला गुन्हा कायम राहील तसेच या गुन्ह्यात लावलेले महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायद्याचे कलमही कायम असेल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सोमवारी दिला.

खंडपीठाच्या या निकालाने नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या संचालकांना दणका बसला असून बसला असून त्यांना आता पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान नगर अर्बन बँकेचे ठेवेदार व बँक बचाव समितीचे समर्थक यांनी आज सायंकाळी पाच वाजता बँकेसमोर जल्लोष करून खंडपीठाच्या या निकालाचे स्वागत केले आहे.

नगर अर्बन बँकेत २८ कर्ज प्रकरणातून सुमारे दीडशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेनसिक ऑडिट झाले व त्यात गैरव्यवहार झालेल्या कर्ज प्रकरणांची संख्या वाढून गैरव्यवहाराच्या रकमेचा आकडाही २९१ कोटींवर गेला. पोलिसांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याचे (MPID) वाढीव कलमही अंतर्भूत केले होते.

या पार्श्वभूमीवर, हा गुन्हा राजकीय दबावापोटी केल्याने तो रद्द करण्याची मागणी तसेच नगर अर्बन बँक मल्टीस्टेट असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने केलेला महाराष्ट्र ठेविदार संरक्षण कायदा या बँकेला लागू होत नसल्याचा दावा बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी संचालकांच्यावतीने खंडपीठात याचिका तक्रार दाखल करून केला होता. पोलीस बँक प्रशासन व तक्रारदार गांधी असे त्यात प्रतिवादी होते. या खटल्यात ठेवेदारांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून ठेवीदार संरक्षण कायदा कलम रद्द होऊ नये अशी मागणी केली होती.

खटल्यात तक्रारदार गांधी यांच्यावतीने ॲड. कातनेश्वर व ठेवीदारांच्या वतीने ॲड. नरवडे, ॲड. काकडे व ॲड. पालवे यांनी काम बघितले.

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर महिनाभराने निकाल…

या बहुचर्चित खटल्याची सुनावणी गेल्या महिन्यात चार एप्रिलला पूर्ण झाली होती. यावर आज निकाल देण्यात आला. बँकेतील घोटाळेबाज संचालकांना खंडपीठाच्या या निर्णयाने मोठी चपराक दिल्याचे मानले जात असून बँक बचाव समितीचे हे मोठे यश मानले जात आहे. न्यायमूर्ती मंगेश पाटील व ब्रह्मे यांनी ठेवीदारांच्या बाजूने निकाल दिला असून राजेंद्र गांधी यांची फिर्याद रद्द न करण्याचा आणि एमपीआयडी कायदा व त्याचे कलम लागू राहणार असल्याचा निर्णय दिल्याने ठेवीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. घोटाळेबाज संचालकांच्या स्थावर मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करत ठेवीदारांचे पैसे मिळण्याचा मार्ग यातून मोकळा झाला असून अटकेपासून दूर पळत असलेल्या संचालकांनाही आता पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जाते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,401
छत्रपती संभाजी नगर खंडपीठ नगर अर्बन बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar03/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बदलते हवामान, वाढते तापमान आणि राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर…

पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

03/10/2026

आज शनिवार ३ ऑक्टोबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घेऊया

03/10/2026

पुस्तकापुरते मर्यादित न राहता ऑडिओ आणि रील्सच्या माध्यमातून विचार पोहोचवा : बाळासाहेब थोरात

02/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.