Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

June 9, 2026

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महिलेला जबरदस्तीने दारू पाजत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार, जिल्हा न्यायालयाने दोघांना दिली कैदेची शिक्षा
न्यायालय

महिलेला जबरदस्तीने दारू पाजत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार, जिल्हा न्यायालयाने दोघांना दिली कैदेची शिक्षा

जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 10, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, दि. १० मे

महिलेला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्या सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे या दोघांना जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी १० वर्ष कैद आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अलिबाग तालुक्यातील तळाशेत गावच्या हद्दीत वडवली रस्त्यावर नेटको कंपनीच्या टेकडीवर रविवारी १९ डिसेंबर २०२० रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पीडित महिला तिच्या मुलीकडे तळाशेत वाडीवर गेली असता ती एकटी असल्याचा फायदा घेत सुरेश लहानू नाईक आणि विशाल कृष्णा म्हात्रे यांनी तिला पाठीमागून पकडून झाडाझुडपात खेचत नेले. तेथे तिला जबरदस्तीने दारू पाजून दोघांनी तिचे कपडे काढून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता.

या संदर्भात पोयनाड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबागच्या पोलीस उप अधीक्षक सोनाली कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी जलद तपास करत अलिबाग न्यायालयात दोन्ही आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

अलिबाग येथील जिल्हा न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता स्मिता धुमाळ-पाटील यांनी १५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. यात फिर्यादी, पीडित साक्षीदार, रासायनिक विश्लेषक, अलिबागचे नायब तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक तपास अधिकारी आणि पोलीस उपअधीक्षक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

बचाव पक्षाचा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी दहा वर्ष कैदेची शिक्षा आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,602
अलिबाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल: पोक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

June 6, 2026

राजेंद्र गडगे याला न्यायालयाचा दिलासा; गंभीर गुन्ह्यांत मिळाला नियमित जामीन

May 29, 2026

नसरापूर हत्याकांड: ६५ वर्षीय नराधमाभोवती कायद्याचा फास आवळला; कोर्टात रोज …

May 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

संगमनेरमधील भेसळखोरांना कोणाचे अभय? तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईनंतरही संगमनेरचे अन्न व औषध प्रशासन सुस्तच! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांचा प्रशासनाला सवाल; आंदोलनाचा इशारा

By अनंत पांगारकरJune 9, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम…

यशोधन कार्यालयात ‘एसटी स्मार्ट कार्ड’ सुविधेचा शुभारंभ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवासात मिळणार मोठी सवलत

June 9, 2026

…अन् थेट कोर्टातच झाली घोषणाबाजी!संगमनेरमधील ‘त्या’ प्रकाराने खळबळ, २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा झटका; अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ वर

June 9, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.