Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

20/08/2026

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिर्डी लोकसभा मतदारसंघात १ हजार ७०८ केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात मतदान पथके रवाना
प्रशासन

शिर्डी लोकसभा मतदारसंघात १ हजार ७०८ केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात मतदान पथके रवाना

शिर्डीचा खासदार निवडण्यासाठी सोमवारी होणार प्रत्यक्ष मतदान
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/05/2024Updated:12/05/2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधत दिल्या शुभेच्छा

शिर्डी, रविवार दि. १२ मे 

निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. १३ मे) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १ हजार ७०८ केंद्रांवर होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथके पोलीस बंदोबस्तात रवाना झाली. मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मनावर कोणतेही दडपण न घेता आपल्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा सूचना केल्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः संवाद साधल्याने आपल्या मनावरील दडपण कमी झाले असून आता अधिक उत्साहाने मतदान कर्तव्य पार पाडणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी सांगितले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील मतदान पथकांना मतदान साहित्य वाटपाच्या कामकाजाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी राहाता तालुका प्रशासकीय भवन येथे पाहणी केली. तसेच यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना त्यांनी यावेळी कामकाजाच्या सूचना दिल्या. यावेळी प्रांतधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, निवासी नायब तहसीलदार हेमंत पाटील, मुख्याधिकारी सतीश दिघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे श्रीरामपूर तहसील इमारतीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. याठिकाणी सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षिरसागर व किरण सावंत उपस्थित होते. अकोले विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप अकोले तहसील कार्यालयात, संगमनेर विधानसभेचे भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल (संगमनेर) व नेवासा विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वाटप न्यू ग्रेन गोडाऊन, नेवासा फाटा येथून करण्यात आले.

अकोले विधानसभा मतदारसंघातील ३०७ मतदान केद्रांसाठी ६१४ बॅलेट युनिट, ३०७ कंट्रोल युनिट व ३०७ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १२० बॅलेट युनिट, ६० कंट्रोल युनिट व ८० व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील २७८ मतदान केद्रांसाठी ५५६ बॅलेट युनिट, २७८ कंट्रोल युनिट व २७८ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०३ बॅलेट युनिट, ५५ कंट्रोल युनिट व ७४ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २७० मतदान केद्रांसाठी ५४० बॅलेट युनिट, २७० कंट्रोल युनिट व २७० व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०५ बॅलेट युनिट, ५२ कंट्रोल युनिट व ६७ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील २७२ मतदान केद्रांसाठी ५४४ बॅलेट युनिट, २७२ कंट्रोल युनिट व २७२ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०४ बॅलेट युनिट, ५२ कंट्रोल युनिट व ७३ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ३११ मतदान केद्रांसाठी ६२२ बॅलेट युनिट, ३११ कंट्रोल युनिट व ३११ व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १२२ बॅलेट युनिट, ६० कंट्रोल युनिट व ८४ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत. नेवासा विधानसभा मतदारसंघातील २७० मतदान केद्रांसाठी ५४० बॅलेट युनिट, २७० कंट्रोल युनिट व २७० व्हीव्हीपॅट मशीन वाटप करण्यात आले. या मतदारसंघासाठी १०४ बॅलेट युनिट, ५२ कंट्रोल युनिट व ६८ व्हीव्हीपॅट मशीन राखीव ठेवण्यात आले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार निवडणूक लढवीत असून एकूण १६ लाख ७७ हजार ३३५ इतके मतदार आहेत. १ हजार ७०८ केंद्रांवर नियुक्त मतदान पथकांमध्‍ये ८ हजार ४०० अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १३ मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी पहाटे साडेपाच वाजता सर्व उमेदवारांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉक पोलची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल.

लाईव्ह वेब कॉस्टींग कक्षाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली पाहणी

मतदान केंद्रांच्या हालचालींवर बारीक लक्ष

शिर्डी लोकसभेतील १७०८ मतदान केंद्रांपैकी ८५४ मतदान केंद्रावर लाईव्ह वेब कॉस्टींग सुरूवात झाली आहे. राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी लाईव्ह वेब कॉस्टींग कक्षात भेट दिली. मतदान केंद्रांवर रवान झालेल्या मतदान पथकातील हालचालींची नोंद घेत झोनल अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील १२ मोठ्या पडद्यावर (स्क्रीनवर) ही लाईव्ह कॉस्टींगच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी १३ मे रोजी २०२४ रोजी सकाळी ५.३० वाजेपासून राखीव कर्मचाऱ्यांची टीम क्षणा-क्षणाला मतदान केंद्रावरील हालाचालींवर बारीक लक्ष ठेवणार आहे.

मतदारांनी मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जावू नये. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या १३ मे रोजी आपला मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे, असे आवाहनही कोळेकर यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 687
लोकसभा निवडणूक शिर्डी लोकसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026

स्वातंत्र्यदिनी भंडारदरा, कळसूबाई फिरण्याचा प्लॅन आहे? आधी पोलिसांचे ‘हे’ नवीन वाहतूक नियम नक्की वाचा!

12/08/2026

डॉ. मीरा ढास यांनी शिर्डी उप माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला

04/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आवाहन

नशामुक्त श्रीरामपूरचा ध्यास: उद्या शहरात भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे श्रीरामपूर पोलिसांचे आवाहन

By Annant Ppangarkar20/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: श्रीरामपूर शहर व परिसरात वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेला अटकाव घालण्यासाठी…

संगमनेरात राजस्थान युवक मंडळातर्फे २२ ऑगस्टपासून चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमाला!

20/08/2026

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी साई दिघे, तर उपाध्यक्षपदी निलेश शिंदे यांची एकमताने निवड

20/08/2026

गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

20/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.