Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » निवडणूक आयोगाने निर्णय बदलला, नाशिकसह चारही मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुका लांबणीवर
राजकारण

निवडणूक आयोगाने निर्णय बदलला, नाशिकसह चारही मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुका लांबणीवर

आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 14, 2024Updated:May 14, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. १४ मे

शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातील दोन अशा चार जागांवर निवडणूक आयोगाकडून १० जूनला निवडणुक घेतली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला असून नाशिकसह चारही मतदार संघाच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहे.

७ जुलै २०२४ रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर भिकाजी दराडे, मुंबई विभाग शिक्षक मतदार संघातील आमदार कपिल पाटील यांच्यासह विधान परिषदेतील मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांचा कार्यकाल संपत असल्याने या चारही मतदारसंघात निवडणुकीचा निवडणूक आयोगाने ८ मे रोजी कार्यक्रम जाहीर केला होता. त्याचबरोबर या निवडणुकीची आचारसंहिता देखील जारी करण्यात आली होती.

मात्र आता जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या चार जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयांना सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्यातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने राज्याचे निवडणूक प्रमुख एस. चोकलिंगम यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून सदरचे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविण्यात आले होते.

शिष्टमंडळाच्या या निवेदनाचा विचार करत निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय दिला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाचे सेक्रेटरी सुमन कुमार दास यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त यांना कळविले असल्याची माहिती मिळाली.

एका प्रेसनोटद्वारे निवडणूक आयोगाने या संदर्भात माध्यमांना माहिती दिली

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 943
निवडणूक आयोग पदवीधर निवडणूक शिक्षक निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026

महाविकास आघाडी आक्रमक; NEET पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांना झालेल्या लाठीमाराविरोधात शुक्रवारी राज्यभर निदर्शने

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या विरोधक आक्रमक: राहुल गांधींनी मागितला पंतप्रधान मोदी, अमित शहा अन् धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

July 21, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.