Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अडचणीत; न्यायालयाने काढले अटकेचे आदेश!
न्यायालय

संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अडचणीत; न्यायालयाने काढले अटकेचे आदेश!

डाळिंबाची केली होती विक्री
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/05/2024Updated:21/05/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, दि. २१ मे 

संगमनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाखाचा न वटणारा धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने काढलेल्या या आदेशामुळे नाहटा यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

नहाटा यांनी संगमनेरमधील दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाने, सुरेश संपतराव सावरे व भाऊसाहेब रामचंद्र वाघचौरे या चौघा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून डाळिंबाची खरेदी केली होती. या बदल्यात त्यांनी दि. ५ एप्रिल २०२३ रोजीचा चौघांचा एकत्रित स्टेट बँक ऑफ इंडियाचा (शाखा लोणी व्यंकनाथ) ६० लाखाचा धनादेश दीपक काशिनाथ जाधव यांच्या नावाने दिला होता.

मात्र हा धनादेश न वटता परत आल्याने जाधव यांनी नहाटा यांच्याकडे पैशाची मागणी केली, मात्र यांनी पैसे न दिल्याने अखेरीस त्यांनी संगमनेर न्यायालयात न वटणारा धनादेश देत फसवणूक केल्याप्रकरणी ॲड. अनिल कासार यांच्या मार्फत जुलै २०२३ मध्ये खटला दाखल केला. न्यायाधीश गायकवाड यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

सुनावणी दरम्यान तारखांना न्यायालयात हजर न राहिल्याच्या कारणावरून जिल्हाध्यक्ष नहाटा यांना न्यायालयाने ९ मे अटक वॉरंट काढले आहे. या वॉरंटची बजावणी करण्याचे आदेश श्रीगोंदा पोलिसांना देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) जिल्हाध्यक्षांना न्यायालयाने काढलेल्या या अटक वॉरंटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुढील सुनावणीवेळी श्रीगोंदा पोलीस नहाटा यांना अटक करून न्यायालयात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advt
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,195
बाळासाहेब नहाटा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक-पुणे बायपासवरील घुलेवाडी हद्दीत रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बुलेट आणि…

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.